दुचाकीच्या धडकेत युवक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:55+5:302021-07-24T04:09:55+5:30
चारचाकीला मालवाहू वाहनाची धडक परतवाडा : चारचाकी वाहन क्रमांक एमएच २७ बीएससी १९५८ ला मालवाहू वाहनाच्या चालकाने समोरासमोर धडक ...
चारचाकीला मालवाहू वाहनाची धडक
परतवाडा : चारचाकी वाहन क्रमांक एमएच २७ बीएससी १९५८ ला मालवाहू वाहनाच्या चालकाने समोरासमोर धडक दिली. यात दोघे जखमी झाल्याची घटना एसएमबी ट्रेडर्ससमोर २२ जुलै रोजी घडली. इकबाल नवाब (२५, रा. काजीपुरा, अंजनगाव) यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी वाहन क्रमांक एमएच२७ बीएक्स १७४५ च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------------------------
शेतातून पितळी नोझल नेताना पकडले
चांदूर बाजार : शेतात रखवालीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला पितळी नोझल चोरताना एक इसम आढळून आला. त्याला शेजाऱ्यांच्या मदतीने पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना जवळा शिवारात २१ जुलै रोजी घडली. रोहित विधळे यांच्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी आरोपी मो. वाजीद मो. साबीर (रा. शिरजगाव बंड) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
-----------------
चारचाकीच्या अपघातातील तरुण ठार
शिरजगाव : चारचाकी क्र. एमएच २७ एसी ८४४० या वाहनाची ट्रायल घेताना झालेल्या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना बहिरम रोडवरील मुकेश ढाब्याजवळ १६ जुलै रोजी घडली. यात जुनेद खान सईद खान (२५, कासदपुरा) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिरजगाव पोलिसांनी मृताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------
गोठ्यातून गाय, गोऱ्हे पळविले
अंजनगाव सुर्जी : रात्री गोठ्यात बांधलेली गाय व दोन गोऱ्हे
अज्ञाताने पळविल्याची घटना अंजनगाव सुर्जी तालुक्यातील धाडी शिवारात १६ जुलै रोजी घडली. धीरज सुखदेव आवनकर (रा. पानअटाई) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.--------------
शेतात अवैध प्रवेश करून शिवीगाळ
दर्यापूर : लागवणने केलेल्या शेतात दुसऱ्याच व्यक्तीने गेटचे कुलूप तोडून आत घुसून भाड्याच्या बैलजोडी पेरणी करून घेतली. यामुळे फिर्यादीचे ५० हजारांचे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्याला हटकले असता शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना आमला शिवारात २० जुलै रोजी घडली. सुभाष बाळकृष्ण वानखडे यांच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी महिलेसह मुलीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------------
भरधाव दुचाकीच्या धडके इसम जखमी
येवदा : भरधाव दुचाकीची अन्य दुचाकीस्वाराला धडक लागल्याने इसम गंभीर जखमी झाला. ही घटना सांगळूद बसस्टँडजवळ १७ जुलै रोजी घडली. माधव नरहरी गावंडे याच्या तक्रारीवरून येवदा पोलिसांनी २२ जुलै रोजी दुचाकी क्र. एमएच २७ ९८५८ च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------------
क्षुल्लक कारणावरून बॅटने मारहाण
तळेगाव दशासर : क्रिकेट खेळताना मुलांना समाजवल्याच्या कारणावरून महिलेच्या डोक्यावर बॅटने मारून जखमी केले. ही घटना तळेगाव दशासर येथे १९ जुलै रोजी घडली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गजानन श्रावण सुरजुसेसह महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------
ट्रकचालकाला काठीने मारहाण
तळेगाव दशासर : रस्त्यात गायींचा कळप आल्याने हाकलले असता, गुराख्याने ट्रकचालकाला खाली ओढून काठीने मारहाण केल्याची घटना २२ जुलै रोजी विजय पेट्रोलपंपाजवळ घडली. अरविंद बाबाराव खोडे (रा. कळंब, जि. यवतमाळ)यांच्या तक्रारीवरून तळेगाव पोलिसांनी नानू कर्मन साठे (३०) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------
महिलेला ६१ हजारांनी गंडविले
चांदूर रेल्वे : चार हजारांचे गिफ्ट लागले आहे, हा ॲप डाऊनलोड करा, असे सांगून प्राप्त ओटीपीद्वारा महिलेच्या खात्यातून ६११०१ रुपये हडपल्याची घटना गांधी चौक येथे १७ जुलै रोजी घडली. महिलेच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी अज्ञाताविद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपासाकरिता प्रकरण सायबर पोलिसात वर्ग करण्यात आला आहे.
----------------
अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग
धारणी : अवैधरीत्या घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना धारणी पोलीस ठाण्यांतर्गत २२ जुलै रोजी घडली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संजू संतोष कनासे भिलालाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------
क्षुल्लक कारणावरून मुलाला मारहाण
चिखलदरा : शेतीचा वाद कोर्टात सुरू असल्याचे सांगितल्यावरून चौघांनी मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना तालुक्यातील सोनापूर येथे घडली. गणेश प्यारेलाल करावले यांच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी शालिकराम हरसुले, नीलेश हरसुले, रुलकेश हरसुले व एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------------
शेतात गुरे चारून पिकांचे नुकसान
चिखलदरा : शेतात गुरे चारून पिकांचे नुकसान केल्याबद्दल हटकले असता, वाद करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सोनापूर येथे घडली. महिलेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी बंडू गणेश करावले, चमन गोरेलाल करावले, केवलदास प्यारेलाल करावले (रा. सोनापूर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------------
गाडेगावातून बकऱ्या पळविल्या
बेनोडा शहीद : गोठ्यात बांधलेल्या बकऱ्या वाहनात टाकून पळून गेल्याची घटना गाडेगाव येथे २२ जुलै रोजी घडली. राजेंद्र संतोष टेकाडे (४८) यांच्या तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------------
दुचाकीच्या धडके युवक जखमी
वरूड : भरधाव दुचाकीची एमएच २७ के ७१५० क्रमांकाच्या दुचाकीला धडक लागल्याने युवक जखमी झाला. ही घटना फिसके मंगल कार्यालयाजवळ २२ जुलै रोजी घडली. प्रणव सुरेश कडू यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी दुचाकीचालक भगवंत वानखडे (रा. टेंबुरखेडा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
----------------
नापिकीच्या पैशावरून भावंडात मारहाण
नांदगाव खंडेश्वर : शेताच्या नापिकाच्या पैशावरून दोन भावात वाद होऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना भगतसिंग चौकात २२ जुलै रोजी घडली. विलास सोनोने यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कैलास गणेश सोनोने, बाळू नेमाडे, दादू बावणे, प्रमोद विरुद्ध गुन्हा नोंदविला.