अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात तरुणाचा खून; जुळ्या शहरात संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 04:29 PM2019-09-30T16:29:10+5:302019-09-30T16:29:32+5:30

परतवाडा येथील टिंबर डेपो भागात सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास एका ३८ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. त्यानंतर परतवाड्याची बाजारपेठ तडकाफडकी बंद करण्यात आली.

Youth murdered in Paratwada in Amravati district | अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात तरुणाचा खून; जुळ्या शहरात संचारबंदी

अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात तरुणाचा खून; जुळ्या शहरात संचारबंदी

googlenewsNext
ठळक मुद्देदगडफेकीत अन्य एकाचा मृत्यू

 लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : परतवाडा येथील टिंबर डेपो भागात सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास एका ३८ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. त्यानंतर परतवाड्याची बाजारपेठ तडकाफडकी बंद करण्यात आली. दरम्यान झालेल्या दगडफेक व मारहाणीत अन्य एकाचा मृत्यू झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. परिणामी अचलपूर, परतवाडा व सरमसपुरा या तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
भरदविसा गवळी समाजाच्या श्याम रघु खोलापुरे या ३८ वर्षीय तरुणावर चाकू व लाठ्याकाठ्यांनी हल्ला करण्यात आला. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी विशिष्ट समुदायातील तिघांना अटक केली. गवळी समाजातील तरुणाचा खून आणि विशिष्ट समुदायातील तिघांना झालेली अटक यातून दोन गट समोरासमोर ठाकले. बेधुंद दगडफेक करण्यात आली. काहींनी जबरदस्तीने बाजारपेठ बंद केली. त्यामुळे तणावात भर पडली. एका जमावाकडून तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. पैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे अतिसंवेदनशील असलेल्या जुळ्या शहरात तणाव निर्माण झाला. स्थानिक तीनही पोलीस ठाण्यातील पोलिसांसह दंगा नियंत्रण पथक व एसआरपीएफचे प्लाटून तैनात करण्यात आले. दुपारी ३ च्या सुमारास ग्रामीण पोलीस अधीक्षक हरीबालाजी एन. यांनी परतवाडा गाठून स्थितीचे अवलोकन केले. त्यानंतर तीनही पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली. अचलपूर - परतवाडा या दोन्ही शहरात प्रचंड तणाव असून, पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली आहे. जुळ्या शहरात संचारबंदी लागू होण्याची अलीकडच्या दहा वर्षांमधील ही पहिली घटना आहे. परतवाडा व अचलपूर या दोन्ही शहरातील शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. दरम्यान दुपारी ४ च्या सुमारास पतवाडा पोलीस ठाण्यावर सुमारे सातशे ते आठशे लोकांचा जमाव चालून आला.

Web Title: Youth murdered in Paratwada in Amravati district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून