युवा रेल्वे कर्मचारी राकेश गोलाईत सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 09:25 PM2018-10-27T21:25:17+5:302018-10-27T21:25:33+5:30
चांदूर रेल्वे ते पुलगाव रस्ते वाहतूक मार्गावर असलेल्या रेल्वे गेटजवळील रेल्वे मार्गाचा एक ट्रॅक तुटलेला आढळल्याने कर्तव्यावर असलेले रेल्वे कर्मचारी राकेश गोलाईत यांनी प्रसंगावधान दाखवून रेल्वे विभागाला कळवले होते. रेल्वेला आडवे होऊन त्यांनी रेल्वेगाडीसुद्धा रोखली होती.
अपघात टळला : चांदुरात तुटला होता ट्रॅक
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर रेल्वे : चांदूर रेल्वे ते पुलगाव रस्ते वाहतूक मार्गावर असलेल्या रेल्वे गेटजवळील रेल्वे मार्गाचा एक ट्रॅक तुटलेला आढळल्याने कर्तव्यावर असलेले रेल्वे कर्मचारी राकेश गोलाईत यांनी प्रसंगावधान दाखवून रेल्वे विभागाला कळवले होते. रेल्वेला आडवे होऊन त्यांनी रेल्वेगाडीसुद्धा रोखली होती. या कार्याची दखल घेऊन रेल्वे विभागाचे डीआरएम यांच्या हस्ते त्यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले.
चांदूर रेल्वे येथे ११ जुलै रोजी नुकतेच रुजू झालेले राकेश गोलाईत यांना अचानक रेल्वे ट्रॅक तुटलेला आढळला. यादरम्यान रेल्वेगाडी येताना पाहून त्यांनी प्रसंगावधान दाखवून ती रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. रेल्वे चालकाच्या हे लक्षात आल्याने त्यानेही रेल्वे थांबवली. या धाडसासाठी राकेश गोलाईत यांचा मंगळवारी नागपूर येथील डीआरएम कार्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट रेल्वे कर्मचारी म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी रेल्वे विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. भीमनगर रेल्वे क्वार्टर येथील समता स्पोर्टिंग, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे.