युवा स्वाभिमानचा कृषी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:19 PM2019-01-01T22:19:59+5:302019-01-01T22:20:15+5:30

राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून युवा स्वाभिमान पक्ष, श्रद्धा आर्ट सोसायटी व शांती इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १४ जानेवारी दरम्यान येथील सायंस्कोर मैदानावर युवा स्वाभिमान कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र केसरी बाला रफीक हा महोत्सवाचे विशेष आकर्षण आहे.

Youth Swabhiman Agricultural Festival | युवा स्वाभिमानचा कृषी महोत्सव

युवा स्वाभिमानचा कृषी महोत्सव

Next
ठळक मुद्दे१० ते १४ जानेवारी दरम्यान आयोजन : बाला रफीक राहणार विशेष आकर्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधून युवा स्वाभिमान पक्ष, श्रद्धा आर्ट सोसायटी व शांती इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने १० ते १४ जानेवारी दरम्यान येथील सायंस्कोर मैदानावर युवा स्वाभिमान कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र केसरी बाला रफीक हा महोत्सवाचे विशेष आकर्षण आहे.
कृषी महोत्सवाचे उद्घाटन १० जानेवारी रोजी होईल. यावेळी शेतकऱ्यांना ‘कृषिरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ११ जानेवारी रोजी आ. रवि राणा यांच्या पुढाकाराने गरजू, गरीब रुग्णांसाठी सकाळी १० ते ५ दरम्यान महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील. १२ जानेवारी रोजी शेतकरी, शेतमजूर, विधवा, वीर शहीद पत्नींना मदत, बेरोजगार गरजूंना साहित्य वाटप, अपंगांना तीनचाकी सायकली तसेच भजनी मंडळींना साहित्य प्रदान केले जाईल. १३ जानेवारी रोजी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महाराजस्व अभियान राबविले जाणार असून, शेतकरी, शेतमजुरांसाठी विविध दाखले उपलब्ध केले जातील तसेच समस्यांची सोडवणूक केली जाईल. १४ जानेवारीे रोजी सकाळी १० वाजता पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी युवा स्वाभिमानच्या मार्गदर्शक नवनीत राणा यांच्या उपस्थितीत महिला मेळावा आयोजित केला आहे.
कृषी महोत्सवात बचतगट, पशू प्रदर्शन, शेतीसंबंधी विविध स्टॉल, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी राहील. शेतमालाची बाजारपेठ, बी-बियाणे, शेती अवजारे, जलसिंचन, जैविक शेती याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. युवा स्वाभिमानचे राजूू रोडगे, संजय हिंगासपुरे, जितू दुधाने, नाना आमले, नगरसेविका सुमती ढोके, ज्योती सैरीसे, जि.प. सदस्य मयूरी कावरे, दिनेश टेकाम, मीनल कावरे, भातकुली नगराध्यक्ष रेखा पवार, शैलेद्र कस्तुरे, गिरीश कासट, आशिष गावंडे, अनूप अग्रवाल आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Youth Swabhiman Agricultural Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.