एकतर्फी प्रेमातून युवकाने घेतले जाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:01 PM2018-07-13T23:01:18+5:302018-07-13T23:01:44+5:30

तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेसमोर एका युवकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडली. २५ वर्षीय युवकाचा कोळसा होऊन घटनास्थळी मृत्यू झाला. एकतर्फी प्रेमातून युवकाने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.

The youth took a burn from one love | एकतर्फी प्रेमातून युवकाने घेतले जाळून

एकतर्फी प्रेमातून युवकाने घेतले जाळून

Next
ठळक मुद्देशेंदोळा खुर्द येथील घटना : अंडरपासमध्ये भरदुपारी घडला थरार

लोकमत न्यूज नेटवर्क
गुरुकुंज मोझरी : तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेसमोर एका युवकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडली. २५ वर्षीय युवकाचा कोळसा होऊन घटनास्थळी मृत्यू झाला. एकतर्फी प्रेमातून युवकाने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.
मोर्शी तालुक्यातील मंगरूळ भिलापूर येथील रहिवासी असलेला २५ वर्षीय युवक शुभम बाळू बोरकर हा तिवसा तालुक्यातील शेंदोळा बुजरूक येथे आपले मामा अनिरुद्ध मंडळे यांच्याकडे आला होता. काही कारणास्तव तो दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेंदोळा खुर्द येथे आला होता.
शेंदोळा येथील भारतीय स्टेट बँक परिसरात एमएच २७ एएक्स २५१३ क्रमांकाची दुचाकी शुभमने उभी केली. यानंतर दुचाकीतील पेट्रोल एका बॉटलमध्ये काढून बँकेपासून काही अंतरावर असलेल्या उड्डाणपुलाच्या अंडरपासमध्ये अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.
शुभम बोरकर हा गावातील एका युवतीवर एकतर्फी प्रेम करीत असल्याची माहिती तिवसा पोलिसांनी याप्रकरणी दिली. तिवसा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतक शुभमचे मामा अनिरुद्ध यांचे बयान नोंदविले असून सहायक पोलीस निरीक्षक शीतल खोब्रागडे पुढील तपास करीत आहेत.
एकतर्फी प्रेमातून घटना!
शुभमचे गावातील एक मुलीवर प्रेम जडले होते. मात्र, ते एकतर्फी होते. याच कारणावरून त्याने आत्महत्येपर्यत मजल गाठली होती, अशी चर्चा दबक्या सुरात होत आहे.

Web Title: The youth took a burn from one love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.