डिगरगव्हाण येथील यात्रेत तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:26 PM2019-03-15T22:26:41+5:302019-03-15T22:26:55+5:30

नजीकच्या डिगरगव्हाण येथे आयोजित दामोदर महाराज यात्रेत शुक्रवारी सायंकाळी दोन गटांत वाद झाला. यामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली, तर तिघे जखमी झाले. समीर गणेश कांबळे (२०, रा. पिंपळझिरा) असे मृताचे नाव आहे. माहुली जहागीर पोलिसांनी विशिष्ट समुदायातील दोघांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे माहुली जहागीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तणावसदृश स्थितीत निर्माण झाली होती.

Yuga's blood on a yatra at Digargavan | डिगरगव्हाण येथील यात्रेत तरुणाचा खून

डिगरगव्हाण येथील यात्रेत तरुणाचा खून

Next
ठळक मुद्देतणावसदृश स्थिती : चाकूचा वार वर्मी लागला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नजीकच्या डिगरगव्हाण येथे आयोजित दामोदर महाराज यात्रेत शुक्रवारी सायंकाळी दोन गटांत वाद झाला. यामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली, तर तिघे जखमी झाले. समीर गणेश कांबळे (२०, रा. पिंपळझिरा) असे मृताचे नाव आहे. माहुली जहागीर पोलिसांनी विशिष्ट समुदायातील दोघांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे माहुली जहागीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तणावसदृश स्थितीत निर्माण झाली होती.
पोलीस सूत्रानुसार, समीर कांबळे हा तिघा मित्रांसोबत शुक्रवारी दुपारी डिगरगव्हाण येथे दामोदर महाराजांच्या यात्रेत गेला होता. यात्रेत फिरत असताना त्याचा पाय विशिष्ट समुदायातील तरुणाच्या पायावर पडला. यावरून दोघांमध्ये मारहाण झाली. त्या तरुणाने बोलावलेल्या समवयस्कांनी लाठ्याकाठ्यांसह चाकूने हल्ला चढविला. समीरच्या छातीवर चाकूचा वार बसला. गंभीर जखमी समीरला जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. मृताच्या नातेवाइकांनी रुग्णालयात रोष व्यक्त केल्याने तणाव निर्माण झाला. याशिवाय घटनास्थळी तसेच माहुली जहागीर ठाण्यात मोठी गर्दी जमली होती. उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ठाण्यात सुरू होती.

पायावर पाय पडल्याच्या कारणावरून दोन तरुणांचा वाद उफाळून आला. त्यानंतर मारहाणीत एक तरुण गंभीर, तर तिघे किरकोळ जखमी झाले. या घटनेमुळे कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती.
- प्रवीण तळी, सहायक पोलीस निरीक्षक

Web Title: Yuga's blood on a yatra at Digargavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.