युवा सेनेने सोडला महावितरण कार्यालयात साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:13+5:302021-07-20T04:11:13+5:30

नांदगाव खंडेश्वर : नांदगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील गेल्या एक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिक हैराण झाले ...

Yuva Sena releases snake in MSEDCL office | युवा सेनेने सोडला महावितरण कार्यालयात साप

युवा सेनेने सोडला महावितरण कार्यालयात साप

Next

नांदगाव खंडेश्वर : नांदगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील गेल्या एक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. भारनियमन नसतानाही विजेचा लपंडाव सुरू असतो. या समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी सोमवारी दाखल होऊन महावितरण कार्यालयात साप सोडला.

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विलास शिंदे यांना तक्रारी देऊनसुद्धा विजेचा खेळखंडोबा थांबला नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बहुतांश भागात नगरपंचायत व ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पथदिवे बंद पडले आहेत. महावितरणच्या या अनागोंदी कारभारामुळे एक महिन्यापासून नागरिक त्रस्त आहेत. स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील एक्स-रे मशीन व इतर यंत्रे व्होल्टेजअभावी निकामी झाले आहेत. त्याच्या निषेधार्थ युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी कंपनीच्या कार्यालयात साप छोडो आंदोलन केले व सात दिवसांचा अल्टिमेटम दिला. यावेळी सरपंच गोकुळ राठोड, सूरज औतकर, निखिल मोरे, नीलेश निंबरते, पवन ठाकरे, अक्षय राणे, अजय काळे, धनंजय भडके, आशिष हटवार, पंकज रामगावकर, पवन पुसदकर,अक्षय तुपट, आशिष भाकरे, पवन मोकडेकर, अभय बनारसे, शुभम रावेकर, अमन मानकर, रोशन भातुलकर, विक्की बाविस्थळे, सागर गटुले, तेजस जवळकर, श्याम मुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

190721\1846-img-20210719-wa0013.jpg

युवा सेनेने विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात साप सोडला.

Web Title: Yuva Sena releases snake in MSEDCL office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.