जाज्वल्य देशभक्तीचा जोश

By admin | Published: January 26, 2017 12:33 AM2017-01-26T00:33:48+5:302017-01-26T00:33:48+5:30

६७ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त शहरात जय्यत तयारी झाली आहे.

Zeal of patriotism | जाज्वल्य देशभक्तीचा जोश

जाज्वल्य देशभक्तीचा जोश

Next

विभागीय क्रीडा संकुलात मुख्य कार्यक्रम
अमरावती : ६७ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त शहरात जय्यत तयारी झाली आहे.यानिमित्ताने विविध शासकीय, निमशासकीय, खासगी संस्था, संघटनांद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता मोर्शी रोडवरील जवाहलाल नेहरु स्टेडियम येथे पालकमंत्री ध्वजारोहण करतील. यावेळी विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता यांच्यासह बहुंताश शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाकडूनही यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. जिल्हा स्टेडियम येथील सुरक्षेसाठी तीन सहायक पोलीस आयुक्त, दहा पोलीस निरीक्षक, ३५ पोलीस उपनिरीक्षक, २२५ पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत. त्याचप्रमाणे इर्विन चौक ते जिल्हा स्टेडियमपर्यंत वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रण करणार आहेत.
प्रजासत्ताक दिनी कोणताहीी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून शहरातील विविध ठिकाणांची तपासणी केली जात आहे. बसस्थानक, मोठे हॉटेल, रेल्वे स्थानक, मंदिरे आदी ठिकाणांची तपासणी करण्यात आली आहे.शहरात मर्च्युरी पॉईन्टजवळ आढळलेल्या बेवारस कारची बीडीडीएस पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या जात आहे
‘अतिउत्साही’ तरूणाईवर लगाम
प्रजासत्ताक दिनी तरुणाईच्या उत्साहाला उधाण येते. मात्र, अनेकदा कर्णकर्कश आवाजात ओरडणे, ट्रीपल सिट भरधाव वेगाने वाहने पिटाळणे, ध्वनीप्रदूषण करणे, रेसर्स बाईकने धुमाकूळ घालणे आदी प्रकार घडतात. यामुळे प्रजासत्ताकदिनाच्या पावित्र्याला गालबोट लागते. यामुळे यंदा अशा अतीउत्साही तरूणाईवर लगाम कसण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले असून असा प्रकार आढळल्यास दोषींवर कठोर कारवाईचे प्रावधान आहे.

बडनेरा नवीवस्तीतील जयहिंद मैदानात प्रजासत्ताक दिनी शहरातील शाळांचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. झेंडावंदन आटोपल्यानंतर सांस्कृ तिक कार्यक्रमांच्या मेजवानीसाठी शहरवासी एकत्र येतात. नृत्य, सामूहिक कला प्रदर्शन, साहसी उपक्रमांच्या सादरीकरणाचा हा शिरस्ता वर्षानुवर्षे सुरु आहे. महापालिकेच्या पुढाकाराने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.

Web Title: Zeal of patriotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.