‘झिरो बजेट’ शेती काळाची गरज!

By admin | Published: March 11, 2016 12:16 AM2016-03-11T00:16:03+5:302016-03-11T00:16:03+5:30

झिरो बजेट ही काळाची गरज असून यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन सुभाष पाळेकर यांनी केले.

'Zero Budget' Need for Agriculture Time! | ‘झिरो बजेट’ शेती काळाची गरज!

‘झिरो बजेट’ शेती काळाची गरज!

Next

सुभाष पाळेकर : चार दिवसीय प्रशिक्षण शिबिर
वरुड : झिरो बजेट ही काळाची गरज असून यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन सुभाष पाळेकर यांनी केले. स्वाभिमानी शेतकरी संघटना व 'झिरो बजेट' स्वाभिमानी संत्रा उत्पादक संघटनेच्या वतीने आयोजित चार दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ग्रामीण विकास व शेती विकास हा फक्त झीरो बजेट नैसर्गिक शेतीमधूनच होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, रासायनिक शेती व सेंद्रिय शेतीने ग्रामीण शेतीचा पायाच उद्ध्वस्त झाला आहे. जमीन नापीक झाली आहे. भूजल जवळपास नष्ट झाले आहे. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. खेड्यातून तरुण वर्ग शहरात पलायन करतो आहे. शेतकऱ्यांना शेती सोडून किंवा शेती विकून इतर व्यावसायिक मार्गाकडे नेण्याचा घाट घालण्यात येत आहे. परंतु हा विकास शेतकऱ्यांसाठी मारक ठरणारा आहे.
जीव, जमिन, पाणी, पर्यावरणाचा ऱ्हास करणारा सेंद्रीय शेतीचा अवलंब आहे. त्यामुळेच झीरो बजेट नैैसर्गिक शेती ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या व त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी या ‘झीरो बजेट’ नैैसर्गिक शेतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. शिबिरात राज्यातील ६०० चे वर शेतकरी कार्यक्रमाला उपस्थित होते. याप्रसंगी रमेश फिस्के, मनोज जवंजाळ, हरीश कानुगो, महेंद्र देशमुख, आकाश बेलसरे यांनी मार्गदर्शन केले तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भुयार, युवराज बरडे,नीलेश आकोटकर, अतुल देशमुख, वासुदेव मानकर, प्रवीण कुबडे, राहुल चौैधरी, उमेश डबरासे, सतिश पाटणकर, ऋषीकेश राऊत आदींनी प्रयत्न केलेत.

Web Title: 'Zero Budget' Need for Agriculture Time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.