जिल्हा परिषदेचे बजेट एक कोटींचे होणार ?

By admin | Published: February 22, 2016 12:41 AM2016-02-22T00:41:27+5:302016-02-22T00:41:27+5:30

जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पासाठी वित्त विभागाने बांधकाम, सिंचन, समाजकल्याण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, ...

Zilla Parishad budget will be one crore? | जिल्हा परिषदेचे बजेट एक कोटींचे होणार ?

जिल्हा परिषदेचे बजेट एक कोटींचे होणार ?

Next

संकेत : अर्थसंकल्पासाठी १८ मार्चला विशेष सभा
अमरावती : जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पासाठी वित्त विभागाने बांधकाम, सिंचन, समाजकल्याण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा विभाग, शिक्षण, अन्य विभागाचे खातेप्रमुखांकडून योजनानिहाय निधीची आवश्यकता मागील वर्षीच्या बजेटमधील तरतूद, अशी महत्त्वाची माहिती वित्त विभागाने मागविली आहे. या माहितीच्या आधारावर जिल्हा परिषदेत बजेटची तयारी सुरू आहे. मागील वर्षी सुमारे १९ कोटी रूपयांचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेने मंजूर केला होता. यंदा यामध्ये सुमारे १ कोटी रूपयांची भर पडणार आहे.
जिल्हा परिषद सध्या आगामी मार्च महिन्यात मांडलेल्या बजेटची जवळपास अंतिम टप्प्यात आहेत. यंदाचा अर्थसंकल्प मागील वर्षीच्या तुलनेत साधारणपणे १ कोटीने वाढीव राहणार असल्याचे संकेत आहे. जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नात फारसी वाढ झाली नसल्याने यंदाच्या बजेटमध्ये आर्थिक तरतूद फारसी होणार नसल्याचे यावरून दिसून येते. जिल्हा परिषदेचा दरवर्षी मार्च महिन्यात सन २०१६-१७ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प मार्चअखेरीस सादर केला जातो. यासाठी वित्त विभागाकडून फेब्रुवारी महिन्यात या कामाची लगबग सुरू होते. त्यानुसार मुख्यलेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे यांच्या मागदर्शनाखाली वित्त विभागाचे अधिकारी करीत आहे.
जिल्हा परीषदेच्या सेस निधीमधून, अर्थसंकल्पीय तरतूद करावी लागते.उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित असल्याने जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प हा साधारण पणे २० ते २२ कोटीचा राहतो.जिल्हा परिषदेत उत्पन्न वाढीचे पाहिजे तसे साधन नाहीत. त्यामुळे विकास कामासाठी नियोजन करून निधीची तरतूद करतानाही अनेक ठिकाणी काटकसर करावी लागते. यंदाचे अर्थसंकल्पात जिल्ह्यात दुष्काळी परीस्थिती असल्यामुळे अर्थसंकल्पात कृषी विभागासाठी बरीच तरतूद होणार असल्याचे संकेत आहेत. याशिवाय समाजकल्याण, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, सिंचन, पाणीपुरवठा, आदी विभागा भरीव निधी मिळणार असल्याचे संकेत आहेत. ही वित्त विभागाची प्राथमिक स्तरावरील तयारी आहे. मात्र बजेटची तयारी पूर्ण झाल्यानंतर सीईओ व सभापती निर्णय घेणार आहेत.

Web Title: Zilla Parishad budget will be one crore?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.