जिल्हा परिषद : कनिष्ठ, वरिष्ठ सहायकांचा समावेश

By admin | Published: June 7, 2014 12:39 AM2014-06-07T00:39:44+5:302014-06-07T00:39:44+5:30

जिल्हा परिषदेच्या विविध विभागात मागील पाच वर्षापासून एकाच टेबलवर ठाण मांडून बसलेल्या

Zilla Parishad: Junior, Senior Assistants included | जिल्हा परिषद : कनिष्ठ, वरिष्ठ सहायकांचा समावेश

जिल्हा परिषद : कनिष्ठ, वरिष्ठ सहायकांचा समावेश

Next

कर्मचार्‍यांमध्ये खांदेपालट
अमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विभागात मागील पाच वर्षापासून एकाच टेबलवर ठाण मांडून बसलेल्या कनिष्ठ, वरिष्ठ सहायक आणि एका  कनिष्ठ प्रशासन अधिकार्‍यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी टेबल बदलवून दुसर्‍या ठिकाणी पदस्थापना दिली आहे.
जिल्हा परिषदेत पशुसंवर्धन, बांधकाम, सामान्य प्रशासन, शिक्षण विभाग प्राथमिक, आरोग्य, महिला व बालकल्याण आणि सिंचन या सात विभागात  मागील पाच वर्षापासून कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक व कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत कर्मचारी यांचे जिल्हा परिषदेच्या पदावर  विभागनिहाय अंतर्गत टेबल बदल करण्यात आले आहेत.
यामध्ये कनिष्ठ सहाय्यक पाच, वरिष्ठ सहाय्यक सहा आणि एका कनिष्ठ प्रशासन अधिकार्‍यांचा अंतर्गत टेबल बदलविण्यात आलेल्यांमध्ये समावेश  आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेत विविध पदावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना प्रशासकीय कामकाज करताना एकाच ठिकाणी काम करताना पाच वर्षाचा  कालावधी झाल्यास अशा कर्मचार्‍याच्या प्रशासकीय टेबल शासन निर्णयानुसार बदलविण्यात येतात. याचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेतील एकूण  १२ कर्मचार्‍यांचे टेबल बदलविले आहेत. मुख्य कार्यकारी अनिल भंडारी यांनी टेबल बदल केलेल्या कर्मचार्‍यांमध्ये पशुसंवर्धन विभागातील कनिष्ठ  सहाय्यक २, बांधकाम १, सामान्य प्रशासन १, शिक्षण विभाग १, वरिष्ठ सहाय्यकांमध्ये बांधकाम २, शिक्षण एक, महिला व बालकल्याण एक,  आरोग्य विभाग दोन याप्रमाणे समावेश आहे.
नव्याने बदल झालेले विभाग समीर उमले पशुसंवर्धन (शिक्षण), भीमा इंगळे पशुसंवर्धन (सामान्य प्रशासन), नीलेश दहातोंडे बांधकाम  (पशुसंवर्धन), चैतन्य वाकोडे सामान्य प्रशासन (पशुसंवर्धन), किरण बघेले शिक्षण (बांधकाम) या कनिष्ठ सहाय्यकांचा तर वरिष्ठ सहाय्यकांमध्ये  मंगला वानखडे बांधकाम (आरोग्य), आर. के. पवार आरोग्य (सामान्य प्रशासन), आर. एम. गजभिये बांधकाम (आरोग्य), सुनील वानखडे  शिक्षण (महिला बालकल्याण), डी. डी. नागपूरकर आरोग्य बांधकाम, एन. एम. बद्रे महिला बालकल्याण (बांधकाम) आणि कनिष्ठ प्रशासन  अधिकारी पी. एन. पारधी सिंचन विभाग (आरोग्य) याप्रमाणे टेबल बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागात  नवीन कर्मचारी काम करणार असल्याने त्यांना काही दिवस तरी कामात अडचणी येतील. (प्रतिनिधी)
 

Web Title: Zilla Parishad: Junior, Senior Assistants included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.