जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूृप अन् शिक्षक बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:09 AM2021-07-03T04:09:48+5:302021-07-03T04:09:48+5:30

भातकुली तालुक्याचा दौरा; शिक्षण सभापतीच्या आकस्मिक भेटीत प्रकार उघड अमरावती : नवीन शैक्षणिक सत्र गत २८ जूनपासून सुरू झाले. ...

Zilla Parishad school lock and teacher missing | जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूृप अन् शिक्षक बेपत्ता

जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूृप अन् शिक्षक बेपत्ता

Next

भातकुली तालुक्याचा दौरा; शिक्षण सभापतीच्या आकस्मिक भेटीत प्रकार उघड

अमरावती : नवीन शैक्षणिक सत्र गत २८ जूनपासून सुरू झाले. शाळा सुरू होण्याच्या चौथ्याच दिवशी जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती सुरेश निमकर यांनी भातकुली तालुक्यात अचानक शाळा भेटीचा दौरा केला. त्यांनी तीन शाळांना भेटी दिल्या असता, शाळेला कुलूप दिसून आले आणि एकही शिक्षण हजर नसल्याचे आढळून आले.

जिल्हा परिषद शिक्षण सभापतींनी गुरुवार १ जुलै रोजी भातकुली येथील जिल्हा परिषद कन्या शाळेला दुपारी ३ वाजता भेट दिली. शाळेत २ शिक्षक कार्यरत आहे. अशातच शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार किमान एका शिक्षकांनी शाळेत हजर राहून ऑनलाईन शैक्षणिक कार्य करणे आवश्यक होते. परंतु संबंधित शिक्षक दुपारी २ वाजता घरी गेल्याचे सांगण्यात आले. सदर शाळेतील वर्गखोल्यासह परिसरात स्वच्छ नसल्याचे सभापतींनी आढळून आले. त्यानंतर दुपारी ३.१० वाजता येथील जि.प.मराठी मुलांच्या शाळेला भेट दिली असता शाळेतील ३ शिक्षकांपैकी दररोज २ शिक्षकांनी उपस्थित राहणे अपेक्षित राहून शैक्षणिक कार्य करणे आवश्यक आहे. परंतु एकही शिक्षक हजर नसल्याचे आढळून आले. या ठिकाणी कार्यरत सफाई कामगाराकडून माहिती घेतली असता, एक शिक्षिका दुपारी २ वाजताच घरी गेल्याचे सांगण्यात आले. यानंतर शिक्षण सभापतींनी दुपारी ३.३० वाजता आसरा येथील शाळेला भेट दिली असता शाळेला कुलूप लागले होते. एकही शिक्षक हजर नसल्याचे आढळून आले. असाच प्रकार ३.५० वाजता जसापूर शाळेला भेट दिली असता दिसून आला. अचानक भातकुली तालुक्यातील शाळांना दिलेल्या भेटीत जिल्हा परिषदेच्या चारही शाळेला कुलूप अन् शिक्षक घरी असल्याने शिक्षण सभापतींच्या भेटीत आढळून आले आहेत. दरम्यान शाळेला कुलूप आणि शिक्षण गैरहजर असल्याने याबाबत संबंधित शिक्षकांना खुलासा मागविण्याचे आदेश शिक्षण सभापती सुरेश निमकर यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत.

बॉक्स

७ जुलैला सुनावणी

भातकुली तालुक्यात शिक्षण सभापतींनी केलेल्या दौऱ्यात ज्या चार शाळा बंद अन शिक्षक घरी गेल्याचे आढळून आले. या सर्व शिक्षकांनी येत्या ७ जुलै रोजी शिक्षण सभापती सुरेश निमकर यांच्या दालनात प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थित सुनावणी घेतली जाणार आहे.

कोट

१ जुलै रोजी भातकुली तालुक्यातील झेडपी शाळांना अचानक भेटी दिल्यात या दरम्यान चार शाळांना कुलूप होते अन् एकही शिक्षक हजर नव्हता केवळ भातकुली येथील उर्दू शाळेत ५० टक्के प्रमाणे शिक्षण हजर होते. त्यामुळे शाळा बंद ठेवून घरी असलेल्या शिक्षकांवर कडक कारवाई केली जाईल.

- सुरेश निमकर,

सभापती शिक्षण समिती

Web Title: Zilla Parishad school lock and teacher missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.