जिल्हा परिषदेच्या १९० शाळांच्या इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 09:48 PM2017-08-02T21:48:51+5:302017-08-02T21:49:10+5:30

जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या १९० इमारती धोकादायक असल्याचा अहवाल प्रशासनाकडे आला आहे.

Zilla Parishad's 190 school buildings are dangerous | जिल्हा परिषदेच्या १९० शाळांच्या इमारती धोकादायक

जिल्हा परिषदेच्या १९० शाळांच्या इमारती धोकादायक

googlenewsNext
ठळक मुद्देप्रस्ताव मागविले : गतीमान प्रशासकीय कारवाई होणार का?

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळांच्या १९० इमारती धोकादायक असल्याचा अहवाल प्रशासनाकडे आला आहे. त्यापैकी बहुतांश इमारती नव्याने बांधण्यासाठी पंचायत समिती मार्फत गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.
झेडपीच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा करून मंजुरी दिली. जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळांमधील शिकस्त असलेल्या १९० वर्गखोल्या निर्लेखित करण्याची कारवाई झेडपीच्या प्रशासकीय स्तरावर होत असली तरी प्रत्यक्षात शाळांची अवस्था अतिशय बिकट आहे. या इमारतींच्या दुरूस्तीसाठी वेळकाढूपणा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिक्षण विभागाच्या अखत्यारितील १९० वर्गखोल्या धोकाग्रस्त आहेत. वरिष्ठांच्या आदेशानंतरही याविषयी शिक्षण व बांधकाम विभागाकडून तातडीने कारवाई केली जात नाही. त्यामुळे अद्यापही १९० ठिकाणी धोकाग्रस्त असलेल्या वर्गखोल्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्ञानार्जण करीत आहेत.

आठ विषयावर सभापतीनी मागविली माहिती
जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतींनी शिक्षण विभागाला शिकस्त वर्ग खोल्याचे बांधकाम व दुरूस्तीसाठी मुद्देनिहाय माहिती लेखी स्वरूपात मागविली आहे. यात पंचायत समिती अंतर्गत शाळांची संख्या, शाळा निहाय किती वर्गखोल्या अस्तित्वात आहेत. शाळा निहाय आवश्यक असलेल्या वर्ग खोल्या, शाळा निहाय तातडीने दूरूस्ती करणे आवश्यक असलेल्या वर्ग खोल्या, मेजर दुरूस्ती आवश्यक वर्ग खोल्या आणि शाळानिहाय आवश्यक असलेल्या नवीन वर्ग खोल्या आदी विषयावर लेखी माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

शिकस्त वर्गखोल्याची दुरूस्ती व नवीन बांधकाम करण्यासाठी अतिशय तोकडा निधी आहे. त्यामुळे या कामासाठी नेमका किती निधी लागेल व आवश्यक बांधकामे यासंदर्भात प्रशासनाला माहिती मागविली आहे. ही माहिती येताच कामे मार्गी लावू.
- जयंत देशमुख, सभापती शिक्षण समिती

Web Title: Zilla Parishad's 190 school buildings are dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.