जि.प. शाळेत शिक्षण घेतलेली रूपाली एमपीएससीत अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:16 PM2019-06-24T22:16:55+5:302019-06-24T22:17:31+5:30

खाजगी इंग्रजी शाळेत शिक्षण व मुंबई-पुण्या सारख्या शहरातच पूर्वतयारीचे धडे गिरविल्यानंतरच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होता येते, प्रशासकीय सेवेतील प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांची पदे मिळविता येतात, असा समज आहे. मात्र, हा समज खोडून काढत जिल्हा परिषद मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या रुपाली मोगरकरने एमपीएसी परीक्षेत ठसा उमटविला आहे.

Zip The quality of education taught in the school is in MPSc | जि.प. शाळेत शिक्षण घेतलेली रूपाली एमपीएससीत अव्वल

जि.प. शाळेत शिक्षण घेतलेली रूपाली एमपीएससीत अव्वल

Next
ठळक मुद्देअस्मिता मराठीची : धामणगाव तालुक्याचा बहुमान

मोहन राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : खाजगी इंग्रजी शाळेत शिक्षण व मुंबई-पुण्या सारख्या शहरातच पूर्वतयारीचे धडे गिरविल्यानंतरच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होता येते, प्रशासकीय सेवेतील प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांची पदे मिळविता येतात, असा समज आहे. मात्र, हा समज खोडून काढत जिल्हा परिषद मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेल्या रुपाली मोगरकरने एमपीएसी परीक्षेत ठसा उमटविला आहे. शुक्रवारी घोषित झालेल्या एमपीएससी परीक्षेच्या निकालात राज्यात मुलींमधून प्रथम आलेल्या रुपाली मोगरकरने धामणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा बहुमान अधिक वाढविला आहे. शेंदुरजना खुर्द येथे अप्पर वर्धा विभागात कालवा निरीक्षक देविदास मोगरकर यांची रूपाली ही मुलगी. एमपीएससी परीक्षेत राज्यात चौथी तर मुलींमध्ये पहिली आली आहे. रूपालीचे पाचवी ते सातवीपर्र्यतचे शिक्षण शेंदुरजना खुर्द येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत झाले. येथील एकता विद्यालयातून दहावीला तिने ८२ टक्के गुण घेतले. त्यानंतर वडिलांची बदली यवतमाळ येथे झाल्याने तिथेच बारावी व जिल्हा शिक्षण प्रशिक्षणमधून डीएड केले. तदनंतर रूपाली सन २०१२ मध्ये जलसंपदा विभागात रूजू झाली.
अनेक परीक्षा केल्या उत्तीर्ण
शासकीय सेवेत असताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात इतिहास, अर्थशास्त्र व इंग्रजी वाड:मय या विषयात तिने पदवी मिळविली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून एमए अर्थशास्त्र केले. मुंबई, पुण्यात एमपीएससीच्या परीक्षेचे वर्ग न करता अमरावती शहरातच तिने एमपीएससीची तयारी केली. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुरवठा निरिक्षक, कर व निर्धारण प्रशासकीय अधिकारी, राज्य गुप्त विभागात सहाय्यक गुप्त अधिकारी अशा शासकीय सेवेसाठी असलेल्या स्पर्धा परीक्षा रुपालीने उत्तीर्ण केल्या. नुकत्याच निकाल घोषित झालेल्या एमपीएससी परीक्षेत ती महिला बालविकास विभागात राज्यातून मुलींमधून पहिली ठरली. रुपालीचा मोठा भाऊ अक्षय मोगरकर हे कार्यकारी अभियंता पॉवर ग्रेड अधिकारी तर रितेश हा व्यापारी क्षेत्रात आहे.

Web Title: Zip The quality of education taught in the school is in MPSc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.