जि.प.च्या डॉक्टरांचे 'अलाउन्स' होणार बंद
By admin | Published: February 14, 2017 12:08 AM2017-02-14T00:08:20+5:302017-02-14T00:08:20+5:30
सर्वच शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी नोकरीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे.
धोरण : अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागात हालचाली
अमरावती : सर्वच शासकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी नोकरीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. मात्र बहुतांश अधिकारी व कर्मचारी या नियमांचे उल्लंघन करून शहरात वास्तव्य करतात. तसेच हे अधिकारी टी.ए.डी.ए.एच.आर.ए असे भत्तेही उचलतात. अशा प्रकारांवर त्वरित निर्बंध घालण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
त्यानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागातील डॉक्टरांचे सर्व अलाऊन्स बंद करण्यात येणार आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांवरही ही कारवाई केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत.
पूर्वीपासूनच त्याच्यासाठी बहुतांश ठिकाणी निवासाची व्यवस्था केली आहे. मात्र बोटावर मोजक्या ठिकाणीच निवास व्यवस्थेचा अपवाद वगळता सर्व ठिकाणी ही शासकीय सुविधा उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. परंतु अनेक ठिकाणचे निवासस्थाने ओस पडल्याचे चित्र असून नॉनप्रक्टिस अलाऊन्स घरभाडे भत्ता जेवण भत्याची रक्कम उचलली जात असल्याचे वास्तव आहे. त्यावर आता अंकुश ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने त्यादृष्टीने प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास अशा प्रकाराना आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे. (प्रतिनिधी)