१४ प्रगतशील शेतकऱ्यांचा झेडपीने केला कृषी दिनी गौरव
By जितेंद्र दखने | Updated: July 1, 2024 20:28 IST2024-07-01T20:27:36+5:302024-07-01T20:28:48+5:30
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल

१४ प्रगतशील शेतकऱ्यांचा झेडपीने केला कृषी दिनी गौरव
जितेंद्र दखने, अमरावती : कृषी क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील १४ प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव १ जुलै रोजी करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, आत्मा प्रकल्पाच्या संचालक अर्चना निस्ताने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस, कृषी विकास अधिकारी मल्लपा तोडकर, अजय तळेगावकर आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्ह्यात शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शासन पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या शेतकऱ्यांचा समावेश
गौरव करण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये महानंदा खैरकर (जावरा कामनापूर, ता. भातकुली), गाेपाल धुर्वे (भेमडी, ता. वरूड), सागर सवळे (चांदुर बाजार), स्वप्निल ठाकरे (अंजनसिंगी धामणगाव रेल्वे), प्रिया गोंडचवर (जवळा खुर्द, ता. अंजनगाव सुर्जी), मोहन देशमुख (नांदुरा, ता. अमरावती), लक्ष्मण भिलावेकर (राणीगाव, ता. धारणी), अमर धोंडे (बग्गी, ता. चांदुर रेल्वे), सचिन टेंभरे (वाघोडा, ता. नांदगाव खंडेश्वर), जयकृष्ण दिवे (तळेगाव ठाकूर, तिवसा), राहुल मंगळे (नेरपिंगळाई, ता. मोर्शी), दिनेश शित्रे (वडनेरगंगाई, ता. दर्यापूर), राजेश काशीकर (शहापूर वडगाव, ता. अचलपूर), दुर्गादास बिसंदरे (चुरणी ता. चिखलदारा) आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे.