जि.प. आजी माजी पदाधिकाऱ्यांत खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:17 AM2021-09-05T04:17:09+5:302021-09-05T04:17:09+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेत शुक्रवारी अध्यक्षांच्या दालनात माजी उपाध्यक्ष व विद्यमान आरोग्य सभापती यांच्यात दुपारी वाहन चालक व निधी ...
अमरावती : जिल्हा परिषदेत शुक्रवारी अध्यक्षांच्या दालनात माजी उपाध्यक्ष व विद्यमान आरोग्य सभापती यांच्यात दुपारी वाहन चालक व निधी देण्याच्या विषयावर खंडाजंगी झाली. अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या उपस्थितीत हा प्रकार सुरू होताच त्यांनी या यात मध्यस्थी करीत दोघांचीही समजूत काढून हा विषय मिटविला.
३ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेची आमसभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास आटोपल्यानंतर अध्यक्षांच्या उपस्थितीत असलेले आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांना जि.प. माजी उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांनी कापूसतळणी सर्कलमधील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना जिल्हा नियोजन समितीकडून जि.प. आरोग्य विभागाला देण्यात आलेल्या निधीत अन्याय झाला आहे. यासोबतच वाहन चालकांच्या विषयावर आरोग्य सभापतींसोबत संवाद साधला. यादरम्यान दोघांमध्ये संवादातील बोलण्यात मतभेद होत खडाजंगी झाली. अशातच अध्यक्षांनी शिष्टाई करीत हा विषय मिटविला. मात्र, प्रकाराची मिनीमंत्रालयात चांगलीच चर्चा रंगली होती.
कोट
शुक्रवारी अध्यक्षांच्या दालनात माजी उपाध्यक्षांसोबत संवाद साधताना कुठलाही वाद झाला नाही. ज्या विषयावर चर्चा सुरू होती ते सर्व विषय आमच्यामधील आहेत. निधी वितरणातही कुठलाही अन्याय झाला नाही. यावर त्याच्या सर्व प्रश्नांवर सामंजस्याने तोडगाही काढला आहे.
बाळासाहेब हिंगणीकर
कोट
जि.प. कापूसतळणी सर्कलच्या सदस्या पूजा सतीश होडोळ यांना विकास कामांसाठी कुठल्याही प्रकारचा निधी आरोग्य सभापतींनी दिला नाही. कोविड-१९ प्रकोप पाहता यासाठी निधी मिळणे अपेक्षित आहे व कोविड १९ साठी १८ रुग्णवाहिका जिल्ह्याला पुरविण्यात आल्या. यात चालक भरती गोंधळ असल्याचे कळते. अध्यक्षांनी यावर तोडगा काढून महिला सदस्यांंचा अपमान होऊ देऊ नये.
सतीश हाडोळे
माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद