जि.प.,पं.स.आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

By Admin | Published: August 19, 2016 11:59 PM2016-08-19T23:59:54+5:302016-08-19T23:59:54+5:30

मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभागरचना तसेच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला आहे.

ZP, P.R. Reservation Program | जि.प.,पं.स.आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

जि.प.,पं.स.आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

googlenewsNext

आयोगाचे निर्देश : ५ आॅक्टोबरला सोडत
अमरावती : मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभागरचना तसेच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला आहे. यामध्ये ९ ते २३ सप्टेंबर या कालावधीत प्रभागरचना होणार आहे. ५ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी जिल्हा परिषद गटांची व याच दिवशी तहसीलदारांमार्फत पंस गणांची आरक्षण सोडत काढणार आहेत.
जिल्ह्यातील दहा पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा कार्यकाळ मार्च २०१७ अखेरीस संपुष्टात येत आहे. त्याअनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाची पूर्वतयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमिवर आयोगाने प्रभागरचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाख १३ हजार ७०९ इतकी आहे. यामध्ये ३ लाख ४० हजार ५३४ अनुसूचित जाती व ३ लाख ६२ हजार ८९० इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. या आधारावर जिल्हा परिषदेचे ५९ गट राहतील. यामध्ये ३० गट महिलांसाठी राखीव असतील.

कहीं खुशी कहीं गम
अमरावती : सर्वसाधारण प्रवर्गाकरिता २० व याच प्रवर्गात १० गट महिलासाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २० गट राखीव असून यातील ६ गट हे महिलांसाठी आहेत. अनुसूचित जमातींकरिता १२ गट राखीव आहेत. यामध्ये ६ गट महिलांसाठी आहेत. नागरिकांच्या मागासप्रर्वगासाठी १६ गट राखीव असून यातील ८ गट महिलांसाठी आहेत. पंससाठी यावेळी ११८ गण राहणार आहेत. या निवडणुकीसाठी चिखलदरा, अमरावती व दर्यापूर तालुक्यातील प्रत्येकी एक गट वाढला आहे. तर अंजनगाव सुर्जी, भातकुली व चांदूररेल्वे तालुक्यातील प्रत्येकी एक गट या निवडणुकीसाठी कमी करण्यात आला आहे.
यामध्ये अंजनगाव सुर्जी, भातकुली तालुक्यांतील २०१२ मध्ये असलेल्या ४ गटांऐवजी आता तीनच गट राहणार आहेत. तर चांदूररेल्वे तालुक्यात तीनऐवजी दोनच गट राहतील. या तीन तालुक्यांत झेडपीचा एक गट कमी झाला आहे. तर दर्यापूर तालुक्यांत ४ऐवजी पाच गट होणार आहेत. चिखलदरा तालुक्यात एक गट वाढला असून तीनऐवजी चार गट झाले आहेत. त्यामुळे या तालुक्यातून चार सदस्य आगामी निवडणुकीत निवडून द्यावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)

असा आहे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी प्रारूप प्रभागरचना प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करतील. त्या प्रस्तावाला २३ सप्टेंबरला मान्यता देण्यात येईल. २८ ला जिल्हाधिकारी आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणार आहेत. ५ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी जि.प.गटांची व तहसीलदार पंस.गणांची आरक्षण सोडत काढतील. यावर १० ते २० आॅक्टोबरपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. या हरकतींवर १७ नोव्हेंबरला सुनावणी होवून २५ नोव्हेंबरला अंतिम प्रभागरचना व आरक्षण प्रसिद्ध करण्यात येईल.

Web Title: ZP, P.R. Reservation Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.