लोकप्रतिनिधी दत्तक घेणार झेडपीच्या शाळा

By admin | Published: February 26, 2016 11:59 PM2016-02-26T23:59:52+5:302016-02-26T23:59:52+5:30

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रमाण आणि मराठी शाळांचा घसरलेला दर्जा तसेच मराठी शाळांबद्दल पालकांची बदललेली ...

ZP School will adopt the People's Representatives | लोकप्रतिनिधी दत्तक घेणार झेडपीच्या शाळा

लोकप्रतिनिधी दत्तक घेणार झेडपीच्या शाळा

Next

निर्णय : शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट्य, नव्या शैक्षणिक सत्रात बदल
जितेंद्र दखने अमरावती
इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रमाण आणि मराठी शाळांचा घसरलेला दर्जा तसेच मराठी शाळांबद्दल पालकांची बदललेली मानसिकता यावर पर्याय म्हणून लोकप्रतिनिधींना झेडपीच्या शाळा दत्तक घ्याव्या लागणार आहेत. या शाळांच्या विकासाचे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेऊन ही ‘दत्तक योजना’ राबविली जाईल.
योजनेंतर्गत जिल्ह्यातील आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांना काही शाळा दत्तक घ्याव्या लागतील. सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना राज्य शिक्षण आयुक्तांनी याबाबत पत्र दिले आहे. लोकप्रतिनिधींसाठी दत्तक शाळांची निवड करुन एप्रिल २०१६ पर्यंत या शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट असेल. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे १ हजार ६०१ शाळा आहेत. तुलनेत इंग्रजी शाळांची संख्या अत्यल्प आहे. मात्र दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने समसमान आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जवळपास आठ ते दहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. तीन हजार लोकसंख्येच्या गावातही इंग्रजी शाळा सुरू झाल्या आहेत. पालक देखील मुलांना इंग्रजी शाळांमध्ये पाठविण्यासाठी आग्रही आहेत. परिणामी मराठी माध्यमाच्या शाळांतील प्रवेशसंख्या रोडावली आहे. ही स्थिती बदलण्यासाठी ‘शाळा दत्तक योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सकारात्मक बदल होण्याची चिन्हे आहेत. लोकप्रतिनिधींवर शाळांच्या विकासाची व त्यांचा दर्जा वाढविण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने या शाळांच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोकप्रतिनिधींना तसा अहवालही वरिष्ठांना पाठवावा लागेल.

Web Title: ZP School will adopt the People's Representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.