झेडपीत ई-सेवा पुस्तिक ा अपडेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 01:18 AM2018-07-02T01:18:01+5:302018-07-02T01:18:28+5:30

सेवापुस्तिका गहाळ झाली. खराब झाली नोंदीच घ्यायच्या राहिल्या, या समस्या आता अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर राहणार नाहीत. त्यांना ई-सेवापुस्तिकेद्वारे आॅनलाइन सेवा मिळणार आहेत. प्रत्येकाला आपले सेवापुस्तक अद्ययावत आहे की, नाही हे एका क्लिकवर कळणार आहे.

ZPAT e-service book update | झेडपीत ई-सेवा पुस्तिक ा अपडेट

झेडपीत ई-सेवा पुस्तिक ा अपडेट

Next
ठळक मुद्देआॅनलाईन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांची डोकेदुखी थांबणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सेवापुस्तिका गहाळ झाली. खराब झाली नोंदीच घ्यायच्या राहिल्या, या समस्या आता अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर राहणार नाहीत. त्यांना ई-सेवापुस्तिकेद्वारे आॅनलाइन सेवा मिळणार आहेत. प्रत्येकाला आपले सेवापुस्तक अद्ययावत आहे की, नाही हे एका क्लिकवर कळणार आहे.
अधिकारी कर्मचाºयांसाठी सेवा पुस्तिका हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज असतो. या सेवापुस्तिकेतील नोंदीनुसारच पदोन्नती, वेतनवाढ, सेवानिवृत्तीपर्यंतचे सर्व लाभ व सेवानिवृत्तीत मिळणारेही लाभ मिळतात. मात्र, प्रत्येकवेळी प्रत्येक नोंदीसाठी ही पुस्तिका कर्मचाºयांना घेऊन यावी लागणार आहे. त्यात वेळेत नोंद न केल्यास संबंधित अधिकाºयांसोबत त्या ठिकाणी जावे लागते. आता प्रत्येकाची आॅनलाइन नोंद होणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम या कर्मचाºयांना मानव संपदा हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी करावी लागेल. नोंदणी प्राधिकृत अधिकारी व कर्मचाºयांना करता येणार आहे. संबंधितांचा युजर आयडी व पासवर्ड दिल्यानंतर हे खाते सुरू होईल. यात आतापर्यंतच्या नोंदी अद्ययावत केल्या जातील. त्यानंतर मात्र संबंधित विभागप्रमुखांना आॅनलाइन नोंदी कराव्या लागतील. यात चुकीची नोंद झाल्यास अपील करण्याची संधी आहे कर्मचाºयांना शिल्लक अर्जित वैद्यकीय रजांची माहिती यावरून मिळेल. शिवाय रजाही आॅनलाईन टाकता येणार आहे. शिक्षा तपासणी, वेतनवाढ आदी नोंदी यातच होतील. ज्या नोंदी बाकी आहे त्या संबंधित कर्मचारी व वरिष्ठांना दिसतील. शासन स्तरावर कर्मचाºयांची माहिती एका क्लिकवर मिळेल. झेडपीत यावर काम सुरू झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाºया कर्मचाºयांच्या सेवा पुस्तीका आॅनलाईन करण्याचे काम सुरू आहे. लवकरच सदर प्रक्रिया पूर्ण होईल
- नारायण सानप, डेप्युटी सीईओ सामान्य प्रशासन

Web Title: ZPAT e-service book update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.