पंचायत राज समितीतर्फे झेडपीत तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 01:07 AM2018-03-02T01:07:20+5:302018-03-02T01:07:20+5:30

यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागीय तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. १ मार्च रोजी यवतमाळ जिल्हा परिषदेच्या चमूने अमरावती जिल्हा परिषदेत यशवंत पंचायत राज अभियानाची तपासणी केली.

ZPP inspection by Panchayat Raj committee | पंचायत राज समितीतर्फे झेडपीत तपासणी

पंचायत राज समितीतर्फे झेडपीत तपासणी

Next
ठळक मुद्देविभागीय आयुक्तांना अहवाल : गुणांकनाची पडताळणी

ऑनलाईन लोकमत
अमरावती : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागीय तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. १ मार्च रोजी यवतमाळ जिल्हा परिषदेच्या चमूने अमरावती जिल्हा परिषदेत यशवंत पंचायत राज अभियानाची तपासणी केली. अचलपूर व चांदूररेल्वे पंचायत समितीने वरील अभियानांतर्गत सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी विभागीयस्तरीय तपासणी समितीकडून होणार आहे. राज्यातील अत्युत्कृष्ट जि.प. व पं. समित्यांसाठी शासनाची पुरस्कार योजना आहे. यशवंत पंचायत राज अभियान सन२०१७-१८ अंतर्गत पंचायत राज संस्थांच्या २०१६-१७ मधील कामकाजावर आधारित पुरस्कार दिले जाईल. अचलपूर व चांदूररेल्वे पं.स. तसेच जि.प.च्या तपासणीसाठी समितीची निवड झाली होती. समितीकडून दोन पंचायत समितीची तपासणी ३ मार्चपूर्वी होईल, असे अधिकाºयांनी सांगितले. यावेळी प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी व डेप्युटी सीईओ अरुण मोहोड द्विस्तरीय समितीकडून तपासणी केली.

Web Title: ZPP inspection by Panchayat Raj committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.