चाचणी, उपचार, लसीकरणासाठी झेडपीचा ॲक्शन प्लॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:15 AM2021-04-30T04:15:58+5:302021-04-30T04:15:58+5:30
अमरावती : ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी ...
अमरावती : ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी मोर्शी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर आदी तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालयांना भेटी देऊन अन्य तालुक्यांतही आढावा सुरू केला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या यंत्रणेकडून ग्रामीण भागातील सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नियोजन केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जाणार आहे. विशेष म्हणजे या नियोजनात चाचणी, उपचार आणि लसीकरणावर अधिक भर दिला जाणार आहे. यासाठी डेप्युटी सीईओसह, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आदींची विविध तालुक्याचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. लक्षणे असलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी त्यानंतर पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना तातडीने उपचार देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यावर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने प्राधान्य दिले आहे. यासोबतच कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने लसीकरणाची ही गती वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून समन्वयातून हा प्लॅन यशस्वी करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद प्रशासनाचा आहे.
बॉक्स
गृह विलगीकरणातील रुग्णांवर वॉच
आयसीएमआरच्या नवीन मार्गदर्शक सूचना प्रमाणे ८५ टक्के रुग्णांची गृहिणी करण्यात उपचार होऊ शकतात. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांच्या होम आयसोलेशनवर स्थानिक ग्राम दक्षता समिती व अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना वॉच ठेवण्यासाठी सूचना दिल्या आहेत. आरोग्य विभागाकडून त्यांचे निरीक्षण वेळोवेळी केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यात पंडा यांनी लोकमतशी बोलताना दिली.