झेडपीचे कोविड केअर सेंटर आजपासून होणार कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:13 AM2021-05-21T04:13:24+5:302021-05-21T04:13:24+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेच्या मालटेकडी स्थित विश्रामगृहात साकारलेल्या कोविड केअर सेंटर २१ मे पासून कार्यान्वित केले जाणार आहे. ...
अमरावती : जिल्हा परिषदेच्या मालटेकडी स्थित विश्रामगृहात साकारलेल्या कोविड केअर सेंटर २१ मे पासून कार्यान्वित केले जाणार आहे. यासाठी आवश्यक उपाययोजनांची तयारी करण्यात आलेली आहे. शुक्रवार झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते या सेंटरचा श्रीगणेशा केला जाणार आहे.
यावेळी उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, बांधकाम सभापती सुरेश निमकर, समाजकल्याण सभापती दयाराम काळे, महिला व बालकल्याण सभापती पूजा आमले, सीईओ अविश्यांत पंडा, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले. शिक्षक व कर्मचारी संघटनेचे निवड पदाधिकारी आदींच्या उपस्थित केला जाणार आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णावर नि:शुल्क उपचार केले जाणार आहे. या ठिकाणी रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची सुविधा व अन्य सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय रुग्णाच्या मनोरंजनासाठी एलएडी स्क्रिन, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. रुग्णावर उपचार करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आदींची नियुक्ती केली आहे. सदर कोविड केअर सेंटर जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने व शिक्षक, कर्मचारी यांच्या सहकाऱ्याने कार्यान्वित केले आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
बॉक्स
समन्वय समिती करणार मॉनेटरिंग
जिल्हा परिषद व शिक्षक तसेच कर्मचारी संघटनेच्या मदतीने सुरू करण्यात आलेल्या विश्रागृहातील कोविड केअर सेंटरमध्ये आवश्यक असलेल्या सोयी - सुविधांसाठी जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी यांच्या मार्गदर्शनात समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीच्या माध्यमातून आवश्यक सोई सुविधा व अन्य बाबीवर मॉनिटरिंग केले जाणार आहे.