Kumbh Rashi Bhavishya 2023: कुंभ रास वार्षिक राशीभविष्य: आर्थिक आघाडी मजबूत, परदेश गमनाचे योग; पण, प्रकृती जपा!

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2022-12-29 14:12:412022-12-29 14:16:10 | Updated: 2022-12-29 14:16:10

Kumbh Rashifal 2023: कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. सन २०२३ वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसे असेल? जाणून घ्या...

Open in app

नवीन वर्षात नवीन संकल्प केले जातात. नवीन स्वप्न पाहिली जातात. सन २०२३ वर्षाच्या सुरुवातीलाच स्वामी ग्रह शनी देव आपल्या राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. सन २०२३ वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसे असेल? जाणून घ्या...

२०२३ चे वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खुशखबर घेऊन येणारे आहे. परंतु या वर्षी आपणास सर्वांत अधिक लक्ष आपल्या प्रकृतीवर द्यावे लागेल. आपण जर प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे हितावह ठरणार नाही. प्रसंगी आजार बळावून रुग्णालायात दाखल होऊन उपचार घ्यावे लागू शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे उपयुक्त ठरू शकेल. आपणास आपल्या प्राप्तीत खूप मोठी वाढ होत असल्याचे दिसून येईल, ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. आपण जर नोकरी करत असाल तर आपली पगारवाढ होऊ शकते. आपण जर व्यापार करत असाल तर आपला नफा वाढेल. सरकारी क्षेत्राच्या एखाद्या चांगल्या योजनेचा लाभ घेऊन सुद्धा आपण चांगली आर्थिक प्राप्ती करू शकता. 

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी या वर्षाच्या सुरुवातीस कौटुंबिक जीवन तणावग्रस्त राहिले तरी एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान त्यात सुधारणा होईल. कुटुंबातील ज्येष्ठांचा पाठिंबा मिळून आपण आपल्या कामात उत्तम यश संपादन करू शकाल. वर्षाच्या सुरुवातीस भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता असली तरी ते शक्य तितकी मदत आपणास करतील व त्यामुळे नात्यातील गोडवा कायम राहू शकेल. मात्र, या वर्षी एखादा मित्र आपणास दगा देण्याची शक्यता आहे. मित्रांपासून जरा जपून राहावे. 

कुंभ राशीच्या व्यक्ती जर परदेशात जाण्यास इच्छूक असतील, तर या वर्षभरात आपली इच्छा पूर्ण होऊ शकेल. आपणास परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. जुलै ते सप्टेंबर दरम्यान जमीन, मालमत्तेच्या संबंधित बाबींमध्ये आपल्याला लक्ष घालावे लागू शकते. एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करू शकाल. या वर्षी आपण काही धार्मिक कार्याच्या निमित्ताने प्रवास कराल. तीर्थस्थानांची भेट घेऊन व देव दर्शन घ्याल. याने आपणास मानसिक शांतता प्राप्त होईल. आपला आत्मविश्वास वाढेल, परंतु इतरांच्या बाबतीत हस्तक्षेप करणे टाळावे. या वर्षी आपणास लोकप्रियता मिळेल.

{{{{youtube_video_id####mHrE_-GvCqw}}}}

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :वार्षिक राशीभविष्य २०२३फलज्योतिषराशी भविष्य
Open in App