Mesh Rashi Bhavishya 2023: मेष रास वार्षिक राशीभविष्य: विजयाच्या, पराक्रमाच्या संधी देणारे वर्ष, वाणीत माधुर्य ठेवलेत जग जिंकाल!

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2022-12-29 16:58:032022-12-29 16:58:29 | Updated: 2022-12-29 16:58:29

Mesh Rashifal 2023: वर्षभर अनेक चढ उताराचे प्रसंग येतील, पण जिभेवर गोडवा असेल तर विजय तुमचाच होईल. इच्छा शक्तीच्या बळावर काय घडू शकते ते जाणून घ्या!

Open in app

वर्षाच्या सुरवातीपासूनच आपण आपल्या कामात व्यस्त राहाल. वर्षाच्या सुरवातीस एखादी चांगली संधी हातून निसटण्याची शक्यता असल्याने वाणीतील कठोरपणा मात्र टाळावा लागेल. स्वतःवर नीरंकुशतेचा टीळा लावण्याऐवजी योग्य व अयोग्य ह्यातील फरक समजून मार्गक्रमण केलेत तर ह्या वर्षी प्रगती करण्यात आपणास मदत होईल. 

धार्मिक दृष्ट्या आपण नक्कीच प्रगती कराल. धार्मिक बाबी व आध्यात्मिक प्रवृतीत आपण खूपच आनंद मिळवू शकाल. आपण एखाद्या मंदिरास दान देऊ शकाल किंवा एखाद्या संस्थेत सहभागी होऊन समाजसेवा करू शकाल. 

वर्षाच्या सुरवातीस रवी व बुध आपल्या भाग्यस्थानी असतील, त्यामुळे वडिलांशी संबंध सुधारतील किंवा त्यांच्याकडून आपणास एखादा मोठा लाभ होऊ शकेल. मार्च ते मे दरम्यानचे दिवस अनुकूल असतील. ह्या दरम्यान आपण आपल्या तीव्र उर्जा शक्तीच्या मदतीने अनेक कार्यात यश संपादित कराल व कोणत्याही आव्हानांना सामोरे जाऊ शकाल. 

मे ते जुलै दरम्यानचे दिवस चढ – उतारांचे असतील. ह्या दरम्यान कौटुंबिक जीवनात कलहजन्य स्थिती निर्माण होऊ शकते. आपल्या मातेची प्रकृती बिघडू शकते. असे असले तरी आपणास एखादी मोठी मालमत्ता खरेदी करण्याचा फायदा होऊ शकतो. तसेच जमीन – जुमल्याशी संबंधित बाबीत उत्तम यश प्राप्त होऊ शकते. 

ऑगस्ट व ऑक्टोबर दरम्यान आपला राशी स्वामी मंगळ षष्ठ स्थानी असेल व त्यामुळे कायद्याशी संबंधित बाबीत आपणास यश प्राप्ती होईल व न्यायालयीन निकाल आपल्या बाजूने लागेल. ह्या दरम्यान आपण विरोधकांना चारी मुंड्या चीत करू शकाल. हे दिवस आपणास प्रबळता प्रदान करतील. नोव्हेंबर व डिसेंबर दरम्यान आपल्या कार्यात चढ – उतार येऊन विलंब होण्याची शक्यता असल्याने आपणास थोडे सावध राहावे लागेल. निष्कारण व्यस्त ठेवणाऱ्या प्रवृतींपासून दूर राहावे. 

वर्षाच्या अखेरच्या दोन दिवसात आपणास एखादी चांगली बातमी ऐकण्यास मिळण्याची शक्यता आहे. आपणास एखादा पुरस्कार मिळण्याची शक्यता सुद्धा आहे. प्रवासाच्या दृष्टीने वर्षाचे सुरवातीचे दिवस अनुकूल आहेत. आपणास एखादी तीर्थयात्रा करण्याची संधी सुद्धा मिळू शकते, ज्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होऊन आपणास समाधान लाभेल. 

वर्षाचे मधले दिवस जवळजवळ सामान्यच राहतील. ह्या दरम्यान विशेष प्रवास होणार नसले तरी आपण आपल्या कुटुंबियांसह लहान – सहान प्रवासास जाऊ शकाल. त्यामुळे कौटुंबिक जीवन आनंदित होईल. नोव्हेंबर ते वर्षाच्या अखेरच्या दिवसांपर्यंत आपण प्रवासात व्यस्त असू शकता. ह्या दरम्यान आपणास विदेश प्रवास करण्याची संधी व कामा निमित्त दूरवरच्या प्रवासाचे योग येतील. अशा प्रकारे हे दिवस आपल्यासाठी आनंददायी होतील, परंतु त्यामुळे आपणास भरपूर खर्च सुद्धा करावा लागेल.

{{{{youtube_video_id####UloePshXHZA}}}}

टॅग्स :वार्षिक राशीभविष्य २०२३फलज्योतिषराशी भविष्य
Open in App