आजचे राशीभविष्य: मित्र-परिवारासह दिवस आनंदात जाईल, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल!

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2024-01-16 07:49:542024-01-16 07:52:29 | Updated: 2024-01-16 07:52:29

१६ जानेवारी २०२०३: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Open in app

मेष: शारीरिक व मानसिक अस्वास्थ्याचा अनुभव येईल. सर्दी, खोकला, ताप इत्यादींचा त्रास होईल. पारमार्थिक काम करताना दाम खर्च करावा लागेल. त्यामुळे खर्च वाढेल. आणखी वाचा 

वृषभ: अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात सुख व शांती राहील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा

मिथुन: आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम सुरळितपणे पार पडेल. घर, कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी अनुकूल वातावरण राहिल्याने मनास प्रसन्न वाटेल. आणखी वाचा 

कर्क: आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आरामदायी दिवस आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असतील. बढती मिळू शकते. आणखी वाचा

सिंह: आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी पैसा सुद्धा खर्च होऊ शकतो. घरचे पदार्थ खाणे फायदेशीर ठरेल. नकारात्मक विचार मनात येतील, ते दूर करावे लागतील. आणखी वाचा 

कन्या: आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. यश व कीर्ती सहजपणे प्राप्त होतील. व्यापार - व्यवसायात भागीदारांशी संबंध सकारात्मक राहतील. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संततीची काळजी सतावेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद - विवाद, बौद्धिक चर्चा ह्यापासून शक्यतो दूर राहावे. आणखी वाचा 

वृश्चिक: आज आपण वाद - विवादात अडकाल. संतती विषयी चिंता लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळाल्याने त्यांचा उत्साह अधिकच वाढेल. आणखी वाचा 

धनु: आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज मन अनुत्साही असल्यामुळे मनात अशांती असेल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायक असेल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. आणखी वाचा 

मकर: आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस मित्र - परिवारासह आनंदात जाईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्थावर मिळकती संबंधीची कामे आज करू शकाल. आणखी वाचा

कुंभ: आज द्विधा मनःस्थिती असल्याने निर्णय घ्यायला त्रास होईल. निरर्थक खर्च होतील. बोलण्यावर ताबा नसल्याने कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. आणखी वाचा 

मीन: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. वातावरण उत्साहपूर्ण असल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल. आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App