आजचे राशीभविष्य, १८ जानेवारी २०२४: शारीरिक, मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2024-01-18 07:36:032024-01-18 07:37:01 | Updated: 2024-01-18 07:37:01

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

Open in app

मेष: आजचा दिवस आनंदोस्तव साजरा करण्याचा आहे. आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल. आणखी वाचा 

वृषभ: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपणास विविध चिंता सतावतील. स्नेही व नातलग ह्यांच्याशी मतभेद झाल्याने घरात विरोधी वातावरण निर्माण होईल. आणखी वाचा

मिथुन: आजचा दिवस व्यापारी वर्गासाठी शुभ फलदायी आहे. उत्पन्नात वाढ, मित्रांकडून लाभ होतील. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. आणखी वाचा

कर्क: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापारी वर्गास लाभ होईल. नोकरीत बढती संभवते. नवीन सजावट करून घराची शोभा वृद्धिंगत कराल. आणखी वाचा

सिंह: आजचा दिवस आळस व थकवा ह्यात जाईल. आपल्या तापॅट स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. पोट दुखीने हैराण व्हाल. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. आणखी वाचा 

कन्या: आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. अती उत्साह व क्रोधाचे प्रमाण वाढल्याने आरोग्यावर ताण येण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा 

तूळ: आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्‍या अर्थाने लुटाल. सामाजिक हेतूने कुटुंबीयांसह बाहेर जावे लागेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या भेटी रद्द झाल्याने निराश व क्रोधीत व्हाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आणखी वाचा 

धनु: आज कार्यपूर्ती न झाल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. संतती विषयक बाबींमुळे चिंता वाढतील. शक्यतो आज प्रवास टाळावेत. आणखी वाचा 

मकर: कौटुंबिक कटकटीमुळे मन दुःखी होईल. उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. स्वजनांशी मतभेद होतील. छाती संबंधी आजार होऊ शकतो. आणखी वाचा

कुंभ: आज आपणास मनाने हलके वाटेल. चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. घरात भावंडांसह काही आयोजन कराल. त्यांच्यासह वेळ आनंदात जाईल. मित्रांच्या व आप्तांच्या भेटी होतील. आणखी वाचा 

मीन: आज आपणास खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. रागावर व वाणीवर सुद्धा ताबा ठेवावा लागेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार सावधपणे करावे लागतील. शारीरिक व मानसिक आरोग्य मध्यम राहील. आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App