मेष - आजचा दिवस थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास व प्रवास ह्यासाठी उत्तम आहे. व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक आहे. घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल. आणखी वाचा
वृषभ - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यवसायात नवीन विचार प्रणाली अंमलात आणाल. प्रकृतीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अचानकपणे एखाद्या संकटास सामोरे जावे लागेल. आणखी वाचा
मिथुन - आज मनात नकारात्मक विचार येतील, जे दूर करावे लागतील. अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहन सावधपणे चालवावे. अचानकपणे खर्च वाढतील. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. आणखी वाचा
कर्क - आज आपणास स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद, सुंदर वस्त्रालंकारांचा लाभ व भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभल्याने आपण आनंदित व्हाल. आपली आर्थिक बाजू मजबूत होईल. मन मात्र भरकटत राहील. आणखी वाचा
सिंह - आजचा दिवस व्यापार वृद्धी करण्यास अनुकूल आहे. व्यवसायातील आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. योग्य कारणांसाठी पैसा खर्च होईल. परदेशस्थ व्यावसायीकांमुळे लाभ संभवतात. धनवृद्धि संभवते. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस सौख्यदायी आहे. अलंकार खरेदी करू शकाल. कलेत आवड निर्माण होईल. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक बाबी मार्गी लागतील. घरात आनंद व शांतता लाभेल. आणखी वाचा
तूळ - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. कौटुंबिक वातावरण तणावयुक्त राहील. नोकरी - व्यवसायात मानहानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
वृश्चिक - आज संपत्ती विषयक कामे व घरगुती प्रश्न ह्यांचे निराकरण होऊ शकेल. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. आणखी वाचा
धनु - आज आप्तांशी मतभेद संभवतात. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. आणखी वाचा
मकर - आज आपला कल धार्मिकतेकडे होईल. व्यापार - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल होईल. आपली सगळी कामे सहजपणे पूर्ण होतील. जीवनात आनंद वाढेल. आणखी वाचा
कुंभ - आज धार्मिक व सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. अपघात किंवा शस्त्रक्रियेची शक्यता आहे. दुपार नंतर सर्व काही सुरळीत पार पडेल. आणखी वाचा
मीन - आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी उत्तम फलदायी आहे. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. प्रवास संभवतात. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. दुपार नंतर मात्र प्रत्येक काम जबाबदारीने करावे लागेल. आणखी वाचा