आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2024-11-02 07:29:042024-11-02 07:29:47 | Updated: 2024-11-02 07:29:47

Daily Horoscope: वाचा कसा असेल तुमचा आजचा दिवस

Open in app

मेष-  वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे. जोडीदारासह वैवाहिक जीवनाचा आनंद सुद्धा उपभोगू शकाल. आर्थिक लाभ तसेच प्रवास संभवतात. आणखी वाचा

वृषभ- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल. नियोजनाप्रमाणे सर्व कामे पार पडतील. आर्थिक लाभ संभवतात. आणखी वाचा

मिथुन- आज शरीर व मन बेचैन राहील. नवीन कार्य सुरू करण्याचा बेत आखाल पण काम सुरू करण्यात अडचणी येतील. मानहानी होण्याची शक्यता आहे. संतती विषयक कामासाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा

कर्क- आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आनंद व उत्साह यांचा अभाव राहील. मन चिंतेने ग्रासलेले व अशांत राहील. घरात भांडणाचे वातावरण असेल. आप्तांबरोबर मतभेद होऊ शकतात. आणखी वाचा

सिंह- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज आरोग्य उत्तम राहील. भावंडांसह आनंदात वेळ जाईल. त्यांच्या कडून फायदा होईल. एखादया सुंदर स्थळाला भेट देण्यास जाल. मित्र भेटतील. आणखी वाचा

कन्या- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्यांच्यासह दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा

तूळ- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक व कलात्मक शक्तीची चमक दिसेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. विधायक कार्य हातून घडेल. खंबीर विचाराने काम पूर्ण कराल. आणखी वाचा

वृश्चिक- आज मनोरंजन, आनंद ह्यासाठी पैसा खर्च होईल. चिंता व शारीरिक कष्ट ह्यामुळे आपण त्रासून जाल. एखादा अपघात संभवतो. गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

धनु- आर्थिक, सामाजीक व कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनात पूर्णतः आनंद मिळेल. प्रेमाचा सुखद आनंद घेऊ शकाल. मित्रांसह एखाद्या रम्य स्थळी फिरायला जावू शकाल. आणखी वाचा

मकर- आर्थिक, सामाजीक व कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनात पूर्णतः आनंद मिळेल. प्रेमाचा सुखद आनंद घेऊ शकाल. मित्रांसह एखाद्या रम्य स्थळी फिरायला जावू शकाल. आणखी वाचा

कुंभ- आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. तरीही मनस्वास्थ्य चांगले राहील. कामाचा उत्साह कमी होईल. वरिष्ठांशी सांभाळून राहावे लागेल. अकारण खर्च वाढेल. आणखी वाचा

मीन- आज आपणास अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक तसेच शारीरिक श्रमामुळे स्वास्थ्य खराब होऊ शकते. सर्दी, श्वसनाचा त्रास, खोकला व पोट दुखी यांचा जोर वाढेल. खर्चात वाढ होईल. आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App