मेष- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कुटुंबीय, स्नेही व मित्रांसह एखाद्या स्नेहसंमेलनास उपस्थित राहाल. नवे कार्य हाती घेऊ शकाल. पण अती उत्साहाच्या भरात कामात बिघाड होणार नाही याची काळजी घ्यावी. आणखी वाचा
वृषभ- आजचा दिवस शारीरिक व मानसिक दृष्टया व्यस्त राहण्याचा आहे. एखाद्या काळजीमुळे मनावर ताण येऊन मन:स्वास्थ्य मिळू शकणार नाही. कुटुंबीयांशी मतभेद झाल्याने घरातील वातावरण कलुषित होईल. आणखी वाचा
मिथुन- आजचा दिवस लाभदायी आहे. पत्नी व संतती कडून फायदेशीर बातम्या मिळतील. मित्रांच्या भेटी आनंद देऊन जातील. व्यापारी वर्गाच्या प्राप्तीत भर पडेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. आणखी वाचा
कर्क- नोकरी - व्यवसाय करण्यार्यांना आजचा दिवस खूप लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश होतील व त्यामुळे पदोन्नती होऊ शकते. वरिष्ठांशी महत्त्वपूर्ण बाबींवर मोकळेपणाने चर्चा करू शकाल. आणखी वाचा
सिंह- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल. एखादा प्रवास ठरवाल. स्वास्थ्य साधारणच राहील. पोट दुखीचा त्रास संभवतो. वरिष्ठांशी मतभेद होतील. आणखी वाचा
कन्या - आज नवीन कामे सुरू केल्यास त्यात अडचणी येतील. बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. मन रागीट होईल, म्हणून बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा
तूळ - आजचा दिवस यशस्वितेचा व आनंदाचा आहे. सार्वजनिक जीवनाशी संबंधीत कार्यात यशस्वी व्हाल. आज आपल्यावर भिन्नलिंगी व्यक्तीचा प्रभाव राहील. मौजमजे साठी खर्च होईल. नवीन वस्त्रालंकार खरेदी कराल. आणखी वाचा
वृश्चिक - आज कौटुंबिक शांतीचे वातावरण आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवू शकेल. नियोजित कामात यश मिळेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धी व शत्रूंवर मात करू शकाल. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. पोटाच्या समस्या त्रास देतील. संततीचे स्वास्थ्य व अभ्यास ह्यामुळे चिंतित व्हाल. कार्य सफल न झाल्याने निर्माण होण्यार्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रणयासाठी मात्र अनुकूलता लाभेल. आणखी वाचा
मकर - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी कटुता निर्माण झाल्याने मनाची बेचैनी वाढेल. भोजन अवेळी होऊ शकते. शांत झोप मिळणार नाही. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. आणखी वाचा
कुंभ - चिंता दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल. मनात उत्साह संचारल्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल. भावंडे व स्नेही ह्यांच्याशी वैचारिक एकोपा निर्माण होईल. एखादी महत्वपूर्ण योजना आखाल. आणखी वाचा
मीन - वाद व संघर्ष टाळण्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहावे लागेल. शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा