आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२४: नवीन संबंध जुळण्याची शक्यता, मानसिक स्वास्थ्य लाभेल!

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2024-10-29 07:56:082024-10-29 07:57:37 | Updated: 2024-10-29 07:57:37

Daily Horoscope: वाचा कसा असेल तुमचा आजचा दिवस

Open in app

मेष- आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभाची शक्यता आहे. आणखी वाचा

वृषभ- आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मिथुन- आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपल्या मनात विविध विचार तरंग उमटतील. त्या विचारांत आपण गढून जाल. आणखी वाचा

कर्क- आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. ग्लानीमुळे आज आपले मन दुःखी होईल. प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद ह्यांचा अभाव राहील. आणखी वाचा

सिंह- आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. आणखी वाचा

कन्या- आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. आणखी वाचा

तूळ- आर्थिक नियोजन यशस्वीपणे कराल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आणखी वाचा

वृश्चिक- आजचा दिवस प्रतिकूलतेचा. शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आपल्या वक्तव्याने एखादा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

धनु- आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. मित्रांसह रम्य ठिकाणी प्रवासास जाण्याचा बेत आखाल. आणखी वाचा

मकर- आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी दिवस अनुकूल आहे. संबंधितांकडून लाभ होईल. आणखी वाचा

कुंभ- शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र उत्तम राहील. शरीरात स्फूर्तीचा अभाव असल्याने काम करण्यात उत्साह वाटणार नाही. आणखी वाचा

मीन- आज आपणातील लेखक किंवा कलाकारास कला व्यक्त करण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App