राशीभविष्य, २५ सप्टेंबर २०२३: आर्थिक लाभ संभवतात, आपल्याला नशिबाची साथ लाभेल

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2023-09-25 07:11:162023-09-25 07:15:08 | Updated: 2023-09-25 07:15:08

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Open in app

मेष- आज चंद्र 25 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल. कार्यालयीन किंवा व्यापारी क्षेत्रातील अधिकारी वर्गाशी महत्वाची चर्चा होईल. सरकारी फायदा मिळण्याची शक्यता आहे. कामासाठी एखादा प्रवास घडेल. आणखी वाचा

 

वृषभ- आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील व भविष्यातील योजना ठरवतील. परदेशी प्रवास घडतील. एखाद्या प्रवासाने मन प्रसन्न झाले तरी सुद्धा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

 

मिथुन- आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन कार्य किंवा औषधोपचार आज सुरू करू नये. रागावर संयम ठेवला नाही तर एखाद्या अप्रिय प्रसंगास सामोरे जावे लागेल. खर्च जास्त झाल्याने आर्थिक चणचण भासेल. आणखी वाचा

 

कर्क- आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. समृद्ध जीवनशैली व मनोरंजक वृत्ती ह्यामुळे आज आपण आनंदी राहाल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. मान - प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा

 

सिंह- आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी बोलताना वाणीवर संयम ठेवावा. दैनंदिन कामात विघ्ने येतील. कार्यपूर्तीत अडचणी येतील. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी झाल्याने नैराश्य येईल. आणखी वाचा

 

कन्या- आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज शक्यतो वाद व चर्चा ह्यापासून दूर राहणे हितावह राहील. अचानकपणे खर्चात वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अडचणी येतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्याने मन आनंदित होईल. पोटाच्या तक्रारी वाढू शकतील. आणखी वाचा

 

तूळ- आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात हळवेपणा जास्त प्रमाणात राहील. शारीरिक उत्साहाचा अभाव जाणवेल. मानसिक तणाव सुद्धा असेल. धनाची तसेच कीर्तीची हानी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी राहील. आणखी वाचा

 

वृश्चिक- आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. दिवसभर मन आनंदी राहील. भावंडांशी घराविषयी महत्वाची चर्चा कराल. आर्थिक लाभ संभवतात. नशिबाची साथ लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. आणखी वाचा

 

धनु- आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. वायफळ खर्च होतील. मनास मरगळ येईल. कुटुंबीयांशी गैरसमज झाल्याने मनस्ताप होईल. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. व्दिधा मनःस्थितिमुळे कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. आणखी वाचा

 

मकर- आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या सामाजिक कार्यात आपण सहभागी व्हाल. नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती असेल. प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होईल. मान - सन्मान होतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. आप्तेष्टां कडून भेटवस्तू मिळाल्याने आपण आनंददित व्हाल. आणखी वाचा

 

कुंभ- आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. शक्यतो कोर्ट - कचेरी पासून दूर राहा. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा. कुटुंबियांशी मतभेद होतील. एखादा अपघात संभवतो. आणखी वाचा

 

मीन- आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपण कौटुंबिक व सामाजिक सोहळ्यात सहभागी व्हाल. मित्रांचा सहवास घडेल. त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. एखाद्या रम्य स्थळी सहलीसाठी जाऊ शकाल. प्रत्येक क्षेत्रात आपणाला फायदा होईल. आणखी वाचा

टॅग्स :फलज्योतिष
Open in App