Horoscope: आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२३, महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास अनुकूल दिवस. धनलाभ संभवतो

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2023-07-15 07:45:132023-07-15 07:46:50 | Updated: 2023-07-15 07:46:50

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी.

Open in app

मेष:  आज समाधानी वृत्ती अंगीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती असे दोघांचेही हित जपले जाईल. लेखक व कलाकारांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपार नंतर मात्र चिंता वाढतील व त्यामुळे उत्साह कमी होईल.  आणखी वाचा  

वृषभ:  महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. धनलाभ संभवतो. शारीरिक व मानसिक दृष्टया आपण उत्साहित राहाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. दुपार नंतर व्यावहारिक निर्णय घेण्यात अडचणी येतील व त्यामुळे आलेली एखादी संधी हातून निसटेल.  आणखी वाचा 

मिथुन:  आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. हाती घेतलेली कामे अपूर्ण राहतील. शारीरिक अस्वास्थ्य व मानसिक व्यग्रता जाणवेल. दुपार नंतर कामाचा उत्साह वाढेल. आणखी वाचा 

कर्क: आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायी आहे. एखाद्या सहलीचा बेत आखू शकाल. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. डोळ्यांच्या विकाराचा त्रास सतावेल.  आणखी वाचा 

सिंह: आपल्या राशी पासून चंद्र दशमात असेल. आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. मित्र व स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. नवीन ओळखींचा भविष्यात व्यापारासाठी लाभ होण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा 

कन्या: आज आपणास आपल्या व्यवसायात धनलाभ होईल. दूरवरचे प्रवास करू शकाल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. दुपार नंतर नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आणखी वाचा 

तूळ:  आळस व कामाचा व्याप ह्यामुळे मन व्याकुळ होईल. नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल. प्रकृतीकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने बाहेरील पदार्थ खाऊ नका. प्रवासात अडचणी येतील. पण दुपार नंतर मात्र परदेशस्थ मित्र व संबंधितांकडून काही चांगली बातमी आल्याने आपला आनंद द्विगुणित होईल.  आणखी वाचा 

वृश्चिक:  आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवनात सुख व समाधान प्राप्त होईल. आप्तांसह सामाजिक समारंभात सहभागी होऊ शकाल. एखादा प्रवास संभवतो. दुपार नंतर आरोग्य विषयक तक्रारी उदभवतील. आणखी वाचा 

धनू: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले नसतानाही प्रलंबित कामे आपण पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन करण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आप्तेष्टांशी जवळीक वाढेल.  आणखी वाचा 

मकर:  आपल्या राशी पासून चंद्र पाचवा असेल. आपल्या वक्तृत्व शैलीने इतरांना प्रभावित कराल. गोड बोलून नवीन संबंध प्रस्थापित करू शकाल. आर्थिक नियोजनात यशस्वी व्हाल. नोकरीत सर्वांचे सहकार्य मिळवू शकाल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. आणखी वाचा 

कुंभ: विद्यार्थी, कलाकार व खेळाडू ह्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. पिता व शासनाकडून काही लाभ होऊ शकेल. खंबीर मनोबलामुळे कार्यपूर्ती होण्यात कोणतीही आडकाठी येणार नाही. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील, सबब शक्यतो बाहेरचे खाणे- पिणे टाळा. आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस काल्पनिक विश्वात घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा बेत ठरवू शकाल. दैनंदिन कामे आत्मविश्वास व एकाग्रचित्ताने पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे.  आणखी वाचा 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App