Horoscope: आजचे राशीभविष्य, २ मे २०२३: एखाद्या रम्य ठिकाणास नक्की भेट द्याल, जुने मित्र भेटतील

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2023-05-02 07:27:432023-05-02 07:29:32 | Updated: 2023-05-02 07:29:32

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Open in app

मेष:  आज आपणास शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने यशप्राप्ती कमी झाल्याने हताश होण्याची वेळ येईल.  आणखी वाचा 

वृषभ:  आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास व दृढ मनोबलाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. वडिलां कडून आपणास काही लाभ होईल.  आणखी वाचा 

मिथुन: व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. भावंडे व शेजारी ह्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील. स्वास्थ्य टिकून राहील. आणखी वाचा    

कर्क: आज आपण शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. परिणामतः मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. गैरसमजातून काही मतभेद होतील. आणखी वाचा 

सिंह:  आज भरपूर आत्मविश्वास व दृढ निर्णयशक्ती ह्यांच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्णय घेऊन पूर्ण कराल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा 

कन्या:  आज शारीरिक अस्वस्थते बरोबरच मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आणखी वाचा

तूळ: आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक व मानसिक दृष्टया आपण आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांचा सहवास, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल.  आणखी वाचा 

वृश्चिक:  आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान - सन्मान उचांवेल. नोकरी - व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठ व वडिलधार्‍यांकडून फायदा होईल. आणखी वाचा 

धनु:  आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. शरीरात थकवा, उबग व बेचैनी राहील. प्रकृती साधारण राहील. मन चिंतित असेल. आज शक्यतो प्रवास टाळावेत. संतती विषयी चिंता निर्माण होईल. आणखी वाचा 

मकर:  आज आहाराकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा प्रकृतीत बिघाड होऊ शकेल. आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल.  आणखी वाचा 

कुंभ:  आजचा दिवस भरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल ह्यामुळे प्रणयाराधनेत आपण रंगून जाल. भिन्नलिंगी व्यक्तींचा परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री निर्माण होईल. आणखी वाचा 

मीन:  आज घरातील वातावरण सुख शांतीचे असल्यामुळे दैनंदीन कामे आपण आत्मविश्वास पूर्वक उत्तम प्रकारे करू शकाल. आज आपणास संताप व बोलणे ह्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App