आजचे राशीभविष्य, ०१ जानेवारी २०२४: ६ राशींना शुभ फलदायी, धनलाभाचे योग; मान-सन्मानाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2024-01-01 06:38:552024-01-01 07:12:21 | Updated: 2024-01-01 07:12:21

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक थकवा जाणवेल. शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्यावा. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. संततीची काळजी राहील. कामात यश लाभेल. कामाच्या धावपळीमुळे कुटुंबीयांसाठी वेळ देऊ शकणार नाही. मतभेद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

वृषभ: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. पैतृक संपत्तीपासून लाभ संभवतात. वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीने वागतील. खेळाडू व कलाकारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. संततीसाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस आनंददायी आहे. भावंडे, मित्र, शेजारी ह्यांच्याशी संबंध चांगले राहतील. आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वकच पैसे गुंतवावेत. मनाच्या चंचलतेमुळे विचार सतत बदलतील. तन-मनाला स्फूर्ती लाभेल. नवीन कामाचा आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे. विरोधकांना नामोहरम करू शकाल. नशीबाची साथ लाभेल. आणखी वाचा 

कर्क: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. प्रकृती ठीक राहणार नाही. कुटुंबात मतभेद होतील. मानसिक दृष्टीकोन नकारात्मक राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतील. सर्व प्रकारच्या अवैध बाबींपासून दूर राहणे हितावह राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. वडील व वडीलधाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान होतील. उतावीळपणा सोडावा लागेल. काही कारणाने संताप वाढेल. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. पूर्ण दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा 

कन्या: दिवसभर शारीरिक व मानसिक चिंतेच्या दडपणाखाली राहाल. आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. अचानकपणे खर्च उद्भवतील. मित्रांचे गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. शांत चित्ताने काम करा. संतापामुळे कामात व्यत्यय येईल. मानसिक बेचैनी जाणवेल. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरीत हाताखाली काम करणाऱ्यांपासून सावध राहावे. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ संभवतात. मित्रांच्या भेटी होऊन एखाद्या रमणीय स्थळी सहलीला जाऊ शकाल. काही सुखद बातमी मिळेल. धनप्राप्ती संभवते. प्राप्तीत वाढ होईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. एखाद्या स्त्रीमुळे फायदा होईल. मनासारखे वैवाहिक सौख्य उपभोगू शकाल. आणखी वाचा 

वृश्चिक: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंद व उल्हास राहील. सर्व कामे विना विलंब पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. धनलाभ संभवतो. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. मित्र व संबंधितांकडून लाभ होतील. संततीची समाधान कारक प्रगती होईल. आणखी वाचा 

धनु: आज प्रवासात अडचणी येतील. शरीरास थकवा जाणवेल. प्रकृती नरम गरम राहील. मनात चिंता व व्याकुळता राहील. संततीविषयी काळजी वाटेल. व्यवसायात अडचणी येतील. नशीबाची साथ मिळणार नाही. जोखमीच्या कामापासून शक्यतो दूर राहावे. कार्य साफल्य होणे कठीण आहे. वरिष्ठांशी संघर्ष होतील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. आणखी वाचा 

मकर: आज नोकरी-व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील. कार्यालयीन कामे कौशल्य पूर्वक कराल. व्यावहारिक व सामाजिक कामासाठी प्रवास करण्याची संधी मिळेल. अचानकपणे खर्च उद्भवतील. भागीदारीत मतभेद संभवतात. गुडघेदुखीचा त्रास संभवतो. संताप व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हितावह राहील. नवीन काम सुरू करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही. आणखी वाचा 

कुंभ: आज आपणात खंबीर मनोबल व आत्मविश्वास दिसून येईल. जवळचा प्रवास किंवा आनंददायी पर्यटन कराल. स्वादिष्ट भोजन व नवीन वस्त्रे ह्यामुळे मन प्रसन्न राहील. विवाहितांना वैवाहिक सुख चांगले मिळेल. सामाजिक मान-सन्मानात वाढ होईल. वाहनसुख मिळेल. भागीदारीत लाभ होईल. आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आरोग्य खूप चांगले राहील. घरात शांतता व आनंदाचे वातावरण असेल. दैनिक कामे सुरळीतपणे पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. स्वभाव उतावळा बनेल. बोलण्यात मर्यादा व वर्तनात नम्रता ठेवावी. स्त्रियांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळेल. सहकारी व नोकरांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आणखी वाचा 

 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App