मेष: साहित्य निर्मिती व कलात्मक अभिरुची वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. स्नेही भेटल्याने मन प्रसन्न राहील. दुपारनंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शत्रू व प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी आपला संघर्ष होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा
वृषभ: स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारेल. आणखी वाचा
मिथुन: आजचा दिवस सुखा - समाधानात जाईल. भावंडांशी सौहार्दता निर्माण झाल्याने आपला फायदा होईल. स्नेहीजन व मित्रांचा सहवास घडेल. दुपार नंतर मात्र मनावर नकारात्मक विचारांचा पगडा बसेल. भोजनाची वेळ पाळू शकणार नाही. आणखी वाचा
कर्क: आजचा दिवस लाभदायी आहे. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. दुपार नंतर सहलीचा बेत ठरवू शकाल. आणखी वाचा
सिंह: आज आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलयुक्त राहील. मोठया लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. बोलण्यातील उग्रता कमी केल्यास कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. आणखी वाचा
कन्या: गैरसमज दूर करावे लागतील. एखादा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्राप्तीच्या प्रमाणात खर्च वाढेल. दुपार नंतर वडील व वडीलधार्यांचे सहकार्य लाभेल. आणखी वाचा
तूळ: आज कार्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याने नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील. मनात सतत विविध विचार घोंगावत राहिल्याने मनाची खंबीरता कमी होईल. मित्रांकडून विशेष लाभ होतील. आणखी वाचा
वृश्चिक: आज व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल. कामे सहजगत्या पूर्ण होतील. स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे. सरकारी कामकाजात लाभ होईल. गृहस्थ जीवनात गोडी राहील. दुपार नंतर मित्रांकडून लाभ होईल. आणखी वाचा
धनु: आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वभावातील चिडचिडेपणा वाढेल. एखादा प्रवास संभवतो. व्यवसायात त्रास किंवा वाद होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर मात्र कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. आणखी वाचा
मकर: आज आजारपणावर खर्च करावा लागेल. अचानक धन खर्चाची शक्यता आहे. कुटुंबियांशी मोठा वाद संभवतो. शक्यतो बाहेरचे खाणे पिणे टाळा. आणखी वाचा
कुंभ: आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून वागावे लागेल. वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होईल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. घरातील वातावरण समाधानाचे राहील. दैनंदिन कामात अडचणी येतील. आणखी वाचा
मीन: आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. सहकार्यांचे सहकार्य अल्प प्रमाणात मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता निर्माण होईल. आणखी वाचा