आजचे राशीभविष्य: सरकारी कामात निर्विघ्न यश, प्रगतीची संधी; आर्थिक लाभ, मानाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-03-12 06:51:16 | Updated: March 12, 2025 06:51 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आपल्या तापट स्वभावावर \नियंत्रण ठेवणे हितावह राहील. मानसिक थकवा जाणवेल. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी होईल. संतती विषयी काळजी राहील. कामाच्या व्यापामुळे कुटुंबियांना वेळ देऊ शकणार नाही. सरकारी कामात मात्र यश मिळेल. आणखी वाचा 

वृषभ: आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वास ह्यांच्या जोरावर पूर्ण कराल. लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात आर्थिक यश मिळेल. संततीसाठी पैशांची गुंतवणूक करू शकाल. आणखी वाचा 

मिथुन: आज दिवसाच्या प्रारंभी उत्साह व स्फूर्ती जाणवेल. प्रगतीच्या संधी येतील. झटपट बदलणारे विचार आपणास अडचणीत टाकतील. नवीन कामे सुरू करू शकाल. मित्र, नातेवाईक व शेजारी - पाजारी ह्यांच्याशी सलोख्याचे संबंध राहतील. काही लाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

कर्क:  आज मनात निराशा असल्यामुळे खिन्नता अनुभवाल. कुटुंबियांशी मतभेद व गैरसमज होतील. अहंपणामुळे इतर कोणाच्या भावना दुखवाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर चित्त एकाग्र होणार नाही. धनखर्च वाढेल. असंतोषाच्या भावनेने मन घेरले जाईल. आणखी वाचा 

सिंह: आत्मविश्वास व झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. उक्ती व कृतीतील उग्रपणा व अहंपणा ह्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. लाभ होईल. प्रकृतीची थोडी कुरकुर राहील. वैवाहिक जीवनात माधुर्याचा अनुभव येईल. सरकारी कामे जलद गतीने होतील. आणखी वाचा 

कन्या: आज शारीरिक व मानसिक चिंता बेचैन करतील. एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल. अचानक धनखर्च होईल. दांपत्य जीवनात कटुता निर्माण होईल. मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य राहील. नोकर वर्गाकडून त्रास संभवतो. आणखी वाचा 

तूळ: आज कौटुंबिक जीवनात सुख व आनंद मिळेल. उत्पन्न वाढ संभवते. कामाच्या जागी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. बढती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीय व मित्रांच्या सहवासात खुश राहाल. प्रवास आनंददायी होईल. व्यापारी वर्गाला लाभकारक व्यापार होईल.  आणखी वाचा 

वृश्चिक: आज आपली सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. संसारात आनंद व समाधान राहील. समाजात मान-प्रतिष्ठा मिळेल. वरिष्ठ व वडिलधाऱ्यांची मर्जी राहील. संततीच्या समाधानकारक प्रगतीचा आनंद मिळेल. येणी वसूल होतील. आणखी वाचा 

धनु: आज काही कारणाने आपण अडचणीत सापडाल. कोणतेही काम करण्यात उत्साह वाटणार नाही. शारीरिक व मानसिक व्यग्रता राहील. वेळ काळजीत जाईल. नोकरी - व्यवसायात त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद - विवाद केल्याने हानी होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यांचा अत्यंत दक्षपणाने सामना कराव लागेल. आणखी वाचा 

मकर: आज नकारात्मक विचारांपासून दूर राहा व खाण्या-पिण्याकडे चांगले लक्ष द्या. अचानक खर्च वाढेल. व्यापारात भागीदारांशी मतभेद वाढतील. क्रोध व आवेशावर नियंत्रण ठेवा. सार्वजनिक कामा निमित्तप्रवास करावा लागेल. कामाच्या ठिकाणी आपली प्रशासकीय बुद्धिमत्ता दुर्लक्षित होईल. आणखी वाचा 

कुंभ: प्रेमालाप, प्रवास, पर्यटन, मनोरंजन हे आजच्या दिवसाचा भाग बनतील. मित्र व कुटुंबीयांसह भोजनासाठी बाहेर जाऊ शकाल. उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता आहे. भागीदारांशी चांगले संबंध राहतील. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा व नावलौकिक मिळेल. आत्मविश्वासाने कार्यात यश मिळेल. आणखी वाचा 

मीन: आज दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील. घरात सुख शांती नांदेल. स्वभाव तापट राहील. उक्ती व कृती ह्यात समतोल साधावा लागेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. सहकार्‍यांचे सहकार्य आपले व्यावसायिक काम सरळ बनवतील. लाभ होईल. आणखी वाचा 

 

टॅग्स :दैनिक राशीभविष्यफलज्योतिषराशी भविष्य
Open in App