आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ, नशिबाची साथ; सरकारी फायदा, मान-सन्मानाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2024-01-13 07:00:382024-01-13 07:04:17 | Updated: 2024-01-13 07:04:17

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष:  आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल. कार्यालयीन किंवा व्यापारी क्षेत्रातील अधिकारी वर्गाशी महत्वाची चर्चा होईल. सरकारी फायदा मिळण्याची शक्यता आहे. कामासाठी एखादा प्रवास घडेल. काम वाढेल. आईकडून लाभ संभवतो.आणखी वाचा 

वृषभ: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील व भविष्यातील योजना ठरवतील. परदेशी प्रवास घडतील. एखाद्या प्रवासाने मन प्रसन्न झाले तरी प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कामाचा व्याप वाढेल. आणखी वाचा 

मिथुन: आज नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन कार्य सुरू करू नये. रागावम संयम ठेवला नाही तर एखाद्या अप्रिय प्रसंगास सामोरे जावे लागेल. खर्च जास्त झाल्याने आर्थिक चणचण भासेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. आणखी वाचा 

कर्क: समृद्ध जीवनशैली व मनोरंजक वृत्ती ह्यामुळे आज आपण आनंदी राहाल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. मान - प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखू शकाल. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी बोलताना वाणीवर संयम ठेवावा. दैनंदिन कामात विघ्ने येतील. कार्यपूर्तीत अडचणी येतील. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी झाल्याने नैराश्य येईल. चिंता राहील. आणखी वाचा 

कन्या: आज शक्यतो वाद व चर्चा ह्यापासून दूर राहणे हितावह राहील. अचानकपणे खर्चात वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अडचणी येतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्याने मन आनंदित होईल. शेअर्स, सट्टे बाजारात गुंतवणूक करताना सावध राहावे. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात हळवेपणा जास्त प्रमाणात राहील. शारीरिक उत्साहाचा अभाव जाणवेल. मानसिक तणाव असेल. धनाची तसेच कीर्तीची हानी होईल. जवळच्या नातलगांशी संघर्ष किंवा वाद झाल्याने मनाला यातना होतील. आणखी वाचा 

वृश्चिक: नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. दिवसभर मन आनंदी राहील. भावंडांशी घराविषयी महत्वाची चर्चा कराल. आर्थिक लाभ संभवतात. नशिबाची साथ लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. मित्रांच्या सहवासामुळे मन आनंदित होईल. कामात यश मिळेल. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. वायफळ खर्च होतील. मनास मरगळ येईल. कुटुंबीयांशी गैरसमज झाल्याने मनस्ताप होईल. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. द्विधा मनःस्थितिमुळे कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. दूर राहणार्‍या नातलगांशी संपर्क साधू शकाल. कामाचा व्याप वाढेल. आणखी वाचा 

मकर: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या सामाजिक कार्यात आपण सहभागी व्हाल. नोकरी-व्यवसायात अनुकूल परिस्थिती असेल. प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होईल. मान-सन्मान होतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंददित व्हाल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. आणखी वाचा 

कुंभ: आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा. कुटुंबियांशी मतभेद होतील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. पैसा खर्च होईल. आणखी वाचा 

मीन: आज आपण कौटुंबिक व सामाजिक सोहळ्यात सहभागी व्हाल. मित्रांचा सहवास घडेल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. एखाद्या रम्य स्थळी सहलीसाठी जाऊ शकाल. प्रत्येक क्षेत्रात आपणाला फायदा होईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App