आजचे राशीभविष्य: पत-प्रतिष्ठा वाढेल, सरकारी कामात लाभ; व्यापारात नफा, यशाकारक दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2024-07-14 06:12:222024-07-14 06:44:39 | Updated: 2024-07-14 06:44:39

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ संभवतात. व्यवसायातील प्रगती समाधानकारक असेल. सामाजिक पत-प्रतिष्ठा वाढेल. मित्र व कुटुंबियांसह सहलीस जाऊ शकाल. आणखी वाचा 

वृषभ: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अचानकपणे खर्च करावे लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. कार्यात यशस्वी व्हाल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. संपत्ती विषयक दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील. संततीविषयक चिंता निर्माण होईल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी निर्माण होतील. अचानकपणे खर्च उद्भवतील. मित्रांचा सहवास घडल्याने आपणास आनंद होईल, इतकीच काय ती जमेची बाजू असेल. आणखी वाचा 

कर्क: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपारनंतर काही ना काही कारणाने चिंतीत व्हाल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खर्चात वाढ होईल. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सकाळी आपल्या गोड बोलण्याने इतरांकडून आपली कामे करवून घ्याल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. दुपारनंतर आप्तेष्टां कडून काही लाभ संभवतो. मित्रांचा सहवास घडेल. विरोधकांशी दोन हात करू शकाल. आणखी वाचा 

कन्या: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपल्या प्रभावी वक्तृत्वाने आपण प्रेमळ व लाभदायी संबंध प्रस्थापित करू शकाल. आपले विचार इतरांना पटवून देऊ शकाल. व्यवसायात फायदा होईल. मन आनंदित राहील. आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे मित्रांशी वाद होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपल्या वक्तृत्वाने इतरांची मने जिंकाल. आणखी वाचा 

वृश्चिक: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आज अनेक प्रकारचे लाभ आपणास मिळू शकतील. आपली कीर्ती वाढेल. धनप्राप्ती होईल. मित्रांसाठी पैसे खर्च होतील. फिरण्याचा आनंद लुटू शकाल. दुपारनंतर मात्र, शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. वाद संभवतो. तापटपणा वाढेल. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस लाभदायी आहे. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील. व्यापार-व्यवसायात लाभ होईल. सरकारी कामातून लाभ होतील. अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल. व्यापारात व प्राप्तीत वृद्धी होईल. एखाद्या सहलीस जाऊ शकाल. आणखी वाचा 

मकर: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. प्रवास संभवतो. कामासंबंधी एखादी योजना आकार घेईल. व्यापारात फायदा होईल. आणखी वाचा 

कुंभ: आज आपण जर आपल्या रागावर व वाणीवर संयम ठेवलात तर आजचा दिवस आपण आनंदात घालवू शकाल. कुटुंबियांशी संभाव्य वाद टाळू शकाल. दुपारनंतर मित्रांच्या सहवासात आनंदात वेळ घालवू शकाल. प्रवास संभवतो. विदेशातून एखादी चांगली बातमी ऐकिवात येईल. आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. दैनंदिन कामे शांततेत पूर्ण होतील. मित्रांसह एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. भागीदाराशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होऊ शकतील. दुपारनंतर मात्र, आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आर्थिक खर्च वाढतील. आणखी वाचा 

 

टॅग्स :दैनिक राशीभविष्यफलज्योतिषराशी भविष्य
Open in App