मेष: आज आपणास मोठा आर्थिक लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धी मिळेल. व्यापारात लाभ होईल. एखाद्या सहलीचे यशस्वी नियोजन करू शकाल. दुपारनंतर मात्र मानसिक एकाग्रता होणार नाही. स्वकीयांशी मतभेद संभवतात. पैसा खर्च होईल. आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यावसायिक स्थिती आपणास अनुकूल राहील. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल. कामे सहजपणे पूर्ण होऊ शकल्याने काही लाभ पदरी पडेल. दांपत्य जीवनात आनंद दरवळेल. नवीन कार्याच्या आयोजनासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ संभवतात. आणखी वाचा
मिथुन: आज प्रतिस्पर्धी व वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. मनोरंजनात्मक वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसा खर्च होईल. व्यवसायात वातावरण चांगले राहील. दुपारनंतर शारीरिक व मानसिक दृष्टया अनुकूलता जाणवेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. धनप्राप्ती संभवते. कुटुंबात सुख शांती नांदेल. आणखी वाचा
कर्क: आज अवैध व निषेधार्ह विचारांपासून दूर राहणे हितावह होईल. वाणीवर संयम ठेवा. कुटुंबात भांडण झाल्याने शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. दुपारनंतर परदेशातून एखादी चांगली बातमी येईल. संतती विषयक चिंता निर्माण होईल. नोकरीत वरिष्ठांशी झालेल्या वादामुळे आपल्या मनाला दुःख होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळणे हितावह राहील. आणखी वाचा
सिंह: आज आपण प्रसन्न व आनंदित राहाल. मित्र व संबंधितांसह हिंडण्या-फिरण्याचा बेत आखून आनंददायी सहल सुद्धा करू शकाल. सामाजिक सन्मान होतील. भागीदारांसह सकारात्मक चर्चा होईल. दुपारनंतर मानसिक नैराश्य जाणवेल. संतापाची भावना वाढेल. कुटुंबात वादविवाद होऊ नयेत ह्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. मानसिक शांततेसाठी प्रयत्नशील राहावे लागेल. आणखी वाचा
कन्या: आज स्वभावात जरा जास्त संवेदनशीलता राहील. कार्य सफल झाल्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित राहतील. यश व कीर्ती वाढेल. स्त्रियांना माहेरहून चांगल्या बातम्या मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्नता जाणवेल. घरात सुखशांती नांदेल. प्रत्येक कामातून दृढ मनोबल व आत्मविश्वास दिसून येईल. आणखी वाचा
तूळ: आज आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे लेखन किंवा अन्य विधायक कार्य करण्यात आपण आघाडीवर असाल. विचारात सातत्यपूर्ण बदल झाल्याने मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. आज शक्यतो प्रवास टाळावा. अचानक खर्च उद्भवण्याची शक्यता आहे. दुपारनंतर कामे यशस्वी झाल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. आज यश व कीर्ती प्राप्त होईल. व्यवसायात चांगले सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आणखी वाचा
वृश्चिक: आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. स्वभावातील हट्टीपणा सोडल्यास अनेक समस्या सुटतील. आज नवीन वस्त्रे, अलंकार व सौंदर्य प्रसाधने ह्यावर जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आर्थिक योजना सहजपणे राबवू शकाल. दुपार नंतर वैचारिक स्थैर्य राहणार नाही. आज नवीन कार्य हाती घेणे हितावह राहणार नाही. आणखी वाचा
धनु: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. मित्र व स्वकीयांसह वेळेचा सदुपयोग आनंददायी वातावरणात करू शकाल. दुपारनंतर बेचैन राहाल. सौंदर्य प्रासधने, गृहसजावट व मनोरंजनाची साधने खरेदी करू शकाल. स्थावर मालमत्तेविषयक कागद पत्रांवर सही करताना काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
मकर: आज वाद होण्याची शक्यता आहे. आज एखाद्या धार्मिक किंवा परोपकारी कार्यासाठी पैसा खर्च होईल. कुटुंबीयांशी मतभेद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. दुपारनंतर मन प्रफुल्लित राहील. शारीरिक स्वास्थ्य मिळेल. नशिबाची साथ मिळेल. एखादा प्रवास संभवतो. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे मनाला आनंद वाटेल. आणखी वाचा
कुंभ: आज आपले मन आनंदी राहील. मनात नकारात्मक विचार येतील. आपल्या कृती संयमित ठेवाव्या लागतील. अचानकपणे खर्च उद्भवतील. निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. आपण केलेल्या कामाकडे कोणी लक्ष न दिल्याने आपणास नैराश्य येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील. आणखी वाचा
मीन: आजचा दिवस कोणाशी आर्थिक व्यवहार करण्यास अनुकूल नाही. आज वाद संभवतात. मन एकाग्र होण्यात अडचणी येतील. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आप्तांशी कटुता निर्माण होईल. दुपारनंतर सुधारणा होईल. मनःस्वास्थ्यही मिळेल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. कुटुंबीयांकडून सुख मिळेल. आणखी वाचा