आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२३: अचानक धनलाभ, सरकारी कामात यश; आनंद, उत्साहाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2023-12-16 07:19:332023-12-16 07:22:17 | Updated: 2023-12-16 07:22:17

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीने काही नवीन मांडणी - सजावट ह्याचा विचार कराल. कामात समाधान लाभेल. स्त्रीयांकडून एखादा सन्मान होईल. आईशी सुसंवाद साधू शकाल. निरूत्साहीपणा सोडून द्यावा लागेल. धनु संक्रांति पासूनचा एक महिना आपल्यासाठी चांगला आहे. आपला सन्मान वाढेल. आपली अनेक कामे होतील. विद्यार्थी यशस्वी होतील. प्राप्तीत वाढ होईल. उपाय:-सूर्यास अर्घ्य द्यावा. आणखी वाचा 

वृषभ: आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात करु शकाल. एखादया रमणीय स्थळाला भेट देऊन आपले मन प्रसन्न होईल. दूरचे प्रवास संभवतात. दूरवरच्या मित्रांच्या शुभ बातम्या समजतील. परदेशी जाण्याची संधी लाभेल. व्यापारात आर्थिक लाभ संभवतो. सूर्य आता धनु राशीत भ्रमण करेल. प्रॉपर्टीशी संबंधित कामे आपणास स्थगित करावी लागतील. प्रकृतीची काळजी घ्यावी. गुंतवणुकीशी संबंधित कामांना स्थगिती द्यावी. उपाय:-रोज गायत्री चालिसाचे पठन करावे. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल. नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. क्रोधामुळे काही अनिष्ट होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. घरात किंवा कार्यालयात वाणीवर ताबा ठेवा. वाद टाळा. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. सूर्य आता धनु राशीतून भ्रमण करेल. आपला अहंकार वाढू शकतो. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. व्यावसायिक भागीदाराशी आपले संबंध चांगले राहणार नाहीत. कामाचा व्याप वाढेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. उपाय:-एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा. आणखी वाचा 

कर्क: आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाईल. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वाहन सौख्य लाभेल. प्रतिष्ठेस तडा जाऊ शकतो. व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील. सूर्याचे धनु राशीतून भ्रमण असता अनेक क्षेत्रात आपला फायदा होईल. सरकारी कामात एखादे नवीन काम आपणास मिळू शकते. कार्यालयाकडून आपणास एखाद्या नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. उपाय:-सूर्यास कुंकू मिश्रित पाण्याने अर्घ्य द्यावा. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात अडचणी येतील. दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू व प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. वरिष्ठांशी वाद संभवतात. एखादी अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता आहे. उदासीनता व साशंकता अधिक प्रमाणात राहिल्याने मन उदास होईल. प्रयत्नांच्या मानाने यश कमीच मिळेल. सूर्याचे धनु राशीतील भ्रमण आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. हा एक महिना प्रेमीजनांसाठी काहीसा त्रासदायी असेल. सामाजिक क्षेत्रात सावध राहून कामे करावी लागतील. उपाय:-रोज सूर्याच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करावा. आणखी वाचा 

कन्या: आज संतती विषयक काही चिंता निर्माण होतील. मन विचलीत होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. अचानक खर्च उद्भवतील. बोलताना बौद्धीक चर्चेपासून दूर राहणे हितावह राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. शेअर्स, लॉटरीत नुकसान संभवते. धनु संक्रांति पासूनच्या एका महिन्यात आपणास काहीसे सावध राहावे लागेल. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. भरपूर काम असू शकते, तेव्हा ताण घेऊ नका. जमीन - जुमल्याशी संबंधित कामात अडथळे येतील. उपाय:-आदित्य हृदय स्तोत्राचे पठन करावे. आणखी वाचा 

तूळ: आज मानसिक थकवा जाणवेल. आपण जास्त हळवे व्हाल. मनात उठणार्‍या विचार तरंगांमुळे त्रास होईल. प्रवासासाठी प्रतिकूल आहे. झोप पूर्ण न झाल्याने मानसिक ताण येईल. कौटुंबिक तसेच जमीन - जुमल्याच्या बाबतीत सावध राहावे लागेल. सूर्याचे धनु राशीतील भ्रमण आपल्यासाठी चांगलेच आहे. अनेक त्रास दूर होतील. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आपण एखादा प्रवास करू शकता. काही महत्वाची सरकारी कामे पूर्ण होऊ शकतात. उपाय:-सुर्याष्टकाचे पठन करावे. आणखी वाचा 

वृश्चिक: आज दिवसभर आपण आनंदित राहू शकाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल. सहकार्‍यांकडून सौख्य व आनंद मिळेल. मित्र व नातलगांची भेट होईल. कोणत्याही कामात यश मिळेल. आर्थिक फायदा होईल. नशिबाची साथ मिळेल. भावंडांकडून लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. स्नेह संबंध जुळतील. छोटे प्रवास होतील. धनु संक्रांति पासूनचा एक महिना आपल्यासाठी सामान्याहून चांगला आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी आपला वाद होण्याची संभावना आहे. उपाय:-गायत्री चालिसाचे पठन करावे. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. काही गैरसमजामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड होईल. मन दुःखी राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. कामात अपेक्षित यश न मिळाल्याने मन निराश होईल. कामाचा व्याप वाढेल. अकारण खर्च वाढतील. सूर्य आता आपल्या राशीतून भ्रमण करेल. हा महिना आपल्यासाठी चांगला असला तरी आपण अहंकारीत होऊ शकता. नशिबाची साथ मिळेल. आपण उत्साहित सुद्धा व्हाल. आपला आत्मविश्वास उंचावेल व आपण अनेक कामे सहजपणे करू शकाल. उपाय:-दिवसाची सुरुवात सूर्यास नमन करून करावी. आणखी वाचा 

मकर: आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी - व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल. पदोन्नती संभवते. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. शारीरिक दुखापतीची शक्यता असल्याने सांभाळून राहा. मित्र परिवार व स्नेहीजनांचा सहवास घडल्याने मानसिक शांती लाभेल. सूर्याचे धनु राशीतील भ्रमण आपल्या खर्चात वाढ करू शकेल. असे असले तरी आपली प्रकृती उत्तम राहील. आपण काही महत्वाची कामे कराल. आपल्यासाठी महिना अनुकूल असेल. विरोधकांवर आपण मात करू शकाल. उपाय:-शंकरास जलाभिषेक करावा. आणखी वाचा 

कुंभ: आर्थिक व्यवहार तसेच जमीन - जुमल्यांच्या व्यवहारात आज कोणाला जामीन न राहणे हितावह राहील. मानसिक एकाग्रता राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. आपल्या निर्णयाशी कुटुंबीय सहमत होणार नाहीत. इतरांच्या बाबींत हस्तक्षेप केल्यास काही नुकसान संभवते. संभ्रमावस्था व अचानक संकट ह्यांचा सामना करावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. धनु संक्रांति पासूनचा एक महिना आपल्यासाठी खूपच अनुकूल आहे. आपली काही सरकारी कामे पूर्ण झाल्याने आपण प्रसन्न व्हाल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. व्यापारात लाभ होईल. वडिलांच्या सल्ल्यानुसार कामे करावीत. उपाय:-सूर्यास कुंकू मिश्रित पाण्याने अर्घ्य द्यावा. आणखी वाचा 

मीन: आज मित्रांकडून आपणाला लाभ होईल व त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र व वडीलधार्‍यांशी संपर्क साधू शकाल. एखाद्या रम्य स्थळी सहलीचे नियोजन कराल. नवे स्नेह - संबंध जुळतील व भविष्यात त्याच्यांकडून लाभ होईल. घरातून चांगली बातमी मिळेल. संततीकडून लाभ होईल. अचानक धनलाभ संभवतो. धनु संक्रांतिपासूनचा एक महिना आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. जमीन - जुमल्याशी संबंधित कामे सहजपणे पूर्ण करू शकाल. आपल्यासाठी हा महिना अत्यंत अनुकूल असला तरी आपणास मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. उपाय:-गरिबास गव्हाचे व गुळाचे वाटप करावे. आणखी वाचा 

 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App