मेष: आज आपणास एक वेगळाच अनुभव येईल. एखादी गूढ विद्या व त्यांसंबंधीत गोष्टींचे आकर्षण वाटेल. आज एखाद्या विषयात आपण प्रावीण्य मिळवू शकाल. वाणी व द्वेष भावना ह्यांवर आवर घालावा लागेल. शक्यतो नवीन कार्यारंभ करू नये. प्रवासात त्रास संभवतो. आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. प्रकृती उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. स्वकीय व जवळच्या लोकांसह जास्त वेळ घालवू शकाल. सामाजिक जीवनात यशप्राप्ती होईल. परदेशातून मनासारख्या बातम्या येतील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. वैवाहिक सौख्याचा आनंद उपभोगता येईल. अचानक धनलाभ संभवतो. आणखी वाचा
मिथुन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांततेचे व आनंदाचे वातावरण राहील. सुखाचे प्रसंग येतील. खर्च होईल पण तो कारणी लागेल. आर्थिक लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील. कामात यश मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. खोळंबलेली कामे पूर्ण होतील. संतापाचे प्रमाण मात्र वाढेल. आणखी वाचा
कर्क: आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. नवीन कार्यारंभासाठी आजचा दिवस प्रतिकूल आहे. मानसिक अशांतता व उद्वेगाने मन भरून जाईल. खिन्नता जाणवेल. पोटदुखी, अपचन, अजीर्ण इ. व्याधींमुळे हैराण व्हाल. अचानक पैसा खर्च करावा लागेल. आणखी वाचा
सिंह: आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य नादुरुस्त असेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आपल्या वक्तव्याने गैरसमज वाढतील व आपले मन उदास होईल. आणखी वाचा
कन्या: आज प्रत्येक कामात विचारपूर्वक पाऊल टाकावे लागेल. भावंडांशी सौहार्दाचे संबंध टिकून राहतील. मित्र व स्वकीयांशी सुसंवाद साधू शकाल. प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
तूळ: आज आपले मनोबल कमी राहिल्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे अवघड होईल. नवीन काम किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय आज टाळणे हितावह राहील. आणखी वाचा
वृश्चिक: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवू शकाल. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस समस्याग्रस्त आहे. कुटुंबीयांशी चर्चा होईल व दुःखी व्हाल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. मनाचा अतीउत्साह आवरावा लागेल. आणखी वाचा
मकर: मित्र व स्नेहीजनांचा सहवास घडल्याने आजचा दिवस आनंदात जाईल. सामाजिक क्षेत्र, व्यापार व इतर क्षेत्रातही आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे. आणखी वाचा
कुंभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज प्रत्येक कामात सहजपणे यश मिळू शकेल. मनःस्थिती आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे बढती मिळण्याची शक्यता आहे. वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळतील. आणखी वाचा
मीन: आज आपण मानसिक अस्वास्थ्यामुळे त्रस्त व्हाल. शरीरास थकवा व आळस जाणवेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. संततीची काळजी राहील. शक्यतो महत्वाचे निर्णय आज घेऊ नये. व्यापारात अडचणी येतील. आणखी वाचा