मेष: आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसायात भरभराट होईल. भेटवस्तू प्राप्त होतील, महत्त्वाच्या कामात सोप्या पद्धतीने यश मिळेल, भावंडांशी सख्य राहील. मोठी गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्या. जीवनसाथीशी सूर जुळतील. मन आनंदी राहील.
वृषभ: धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जुन्या गुंतवणुकीचे फायदे होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल. हाती घेतलेले कार्य यशस्वीपणे पूर्ण कराल, मनात आत्मविश्वास राहील.
मिथुन: तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. कार्यक्षेत्रात तुमचा दबदबा राहील, मोठेपणा मिळेल; पण त्यासाठी बरेच परिश्रम करावे लागतील, जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. तुमच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल, कौतुक होईल.
कर्क: आर्थिक व्यवहार जपून करा. कुणी तुम्हाला दिशाभूल करणारी माहिती देऊ शकेल. थोडे सावध राहा. लगेच हुरळून जाऊन निर्णय घेऊ नका. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. अनोळखी लोकांपासून सावध राहा. कागदपत्रे, महत्त्वाच्या वस्तू सांभाळा.
सिंह: ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. अनेक कामे मार्गी लागतील. त्यामुळे तुम्हाला हलके हलके वाटेल, धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या.
कन्या: नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. त्यात तुमचा कस लागेल, गोडीगुलाबीने वागून आपली कामे करून घ्या. इतरांच्या भानगडीत पडू नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा, घरी पाहुणे मंडळी येतील. जीवनसाधीशी गैरसमज होऊ शकतात.
तूळ: कानावर चांगल्या बातम्या पडतील. त्यामुळे तुमचा उत्साह वाढेल, पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. मुलांच्या संगतीकडे लक्ष द्या. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल, काही अनपेक्षित लाभ होऊ शकतात.
वृश्चिक: नोकरीत चांगली परिस्थिती राहील. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. कामानिमित्त फिरणे होईल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, त्यासाठी तुम्हाला बराच खटाटोप करावा लागेल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अचानक धनलाभ होईल.
धनु: व्यवसायात बरकत राहील. तुमच्या समोरील अनेक अडचणी दूर होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. जीवनसाथीशी सूर जुळतील, भेटवस्तू देण्यास हरकत नाही. जवळच्या प्रवासाचा योग येईल. नोकरीत चांगली स्थिती राहील.
मकर: आरोग्याची काळजी घ्या. मनातील शंका-कुशंका काढून टाका. पथ्यपाणी पाळण्यात हयगय करू नका. जीवनसाधीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या, महत्त्वाची कामे पुढे ढकलणे ठीक राहील, आर्थिक आवक चांगली राहील.
कुंभ: ग्रहमान अतिशय लाभदायक आहे. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल, हाती घेतलेले कार्य यशस्वीपणे पूर्ण कराल, जवळच्या प्रवासाचे योग येतील. समाजात तुमचा मान वाढेल. तुम्हाला जीवनसाथीची चांगली साथ मिळेल.
मीन: नोकरीत नवीन संधी मिळेल. प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील, पैसा खर्च करण्याकडे कल राहील. तुमचा सल्ला इतरांसाठी उपयुक्त ठरेल. मुलांची काळजी वाटेल, त्यांच्याशी संवाद साधा. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे.
- विजय देशपांडे (ज्योत्तिषविशारद)