मेष: आज आपणास आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील. वादापासून दूर राहिल्यास कुटुंबियांशी निर्माण होणारी कटुता टाळू शकाल. खाण्या-पिण्याची काळजी घ्यावी. विनाकारण खर्च होतील. घरी तसेच व्यवसायात समजूतदारपणा दाखविणे फायदेशीर राहील. आजचा दिवस आपल्यासाठी सामान्य आहे. आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस फायद्याने भरलेला आहे. आज आपण शरीर व मनाने स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलात्मकता व सृजनात्मकता यांचा उपयोग कराल. आर्थिक योजना बनवाल. धनलाभ होऊ शकतो. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. नवे कपडे, व दागिने ह्यांची खरेदी झाल्याने दिवस आनंदात जाईल. आत्मविश्वासात वृद्धी होईल. आणखी वाचा
मिथुन: आज आपणास बोलण्यावर व व्यवहारात सावध राहावे लागेल. आपल्या वक्तव्याने काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस खर्चाचा आहे. मनाला चिंता लागून राहील. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करावे लागतील. आणखी वाचा
कर्क: आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी-व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषतः स्त्रीवर्गाकडून फायदा होईल. प्रिय व्यक्तीसह वेळ चांगला जाईल. आर्थिक योजना यशस्वी होतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. शरीर व मन स्वस्थ राहील. आणखी वाचा
सिंह: प्रत्येक कामात उशीरा यश मिळेल. कार्यालयात किंवा घरात जबाबदार्यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल. नवीन संबंध स्थापित करणे किंवा कामासंबंधी महत्वाचा निर्णय घेणे हे टाळा. मतभेद होतील. शुभ कार्य ठरविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. आणखी वाचा
कन्या: आज शरीरात थकवा, आळस व चिंता अनुभवास येतील. मतभेद होतील. नोकरीत वरिष्ठांशी वाद होईल. राजनैतिक संकटांचा सामना करावा लागेल. एखादे मांगलिक कार्य किंवा प्रवास ह्यासाठी पैसा खर्च होईल. भावंडांकडून लाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
तूळ: आज प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. टाकून बोलणे किंवा खराब व्यवहार ह्यामुळे वाद व भांडणे होतील. क्रोध, व कामवृत्ती ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. हितशत्रू सरसावतील. अचानक धनलाभ होईल. वेळेवर जेवण न मिळणे किंवा होणारा अधिक खर्च मनाला अस्वस्थ करतील. आणखी वाचा
वृश्चिक: आज आपणास नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय ह्यातून भरपूर लाभ होणार आहे. तसेच मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्याकडून ही लाभ होईल. सामाजिक समारोह, पर्यटन यासारख्या ठिकाणी जाऊ शकाल. आपण आनंदी राहाल. संपत्ती वाढेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे . घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकर व सहकारी आपणाला मदत करतील. कार्यात सफलता व यश मिळेल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात करू शकाल. मैत्रीणींची भेट होईल. आणखी वाचा
मकर: आज कला व साहित्य क्षेत्रात असणार्या व्यक्ती त्या क्षेत्रात विशेष कामगीरी करतील. रचनात्मक व सृजनशील शक्तींचा इतरांना परिचय द्याल. प्रेमिकांना परस्परांत गाढ प्रेमाचा अनुभव येईल. भेटी रोमांचक ठरतील. शेअर - लॉटरी यात लाभ होईल. मित्रांकडून लाभ होईल. आणखी वाचा
कुंभ: आज स्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. स्त्रिया सौंदर्य - प्रसाधने, वस्त्र, अलंकार यांवर जास्त खर्च करतील. विद्यार्थ्यांना यश लाभेल. स्वभावात हट्टीपणा राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
मीन: आजचा दिवस कार्यात यश मिळण्यास व महत्वपूर्ण निर्णय घेण्यास उत्तम आहे. आज विचारांत स्थैर्य असेल. त्यामुळे कोणतेही कार्य व्यवस्थीत करू शकाल. कलाकारांना कला प्रदर्शन करण्याची उत्तम संधी मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल. मित्रांसह लहानसा प्रवास कराल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आणखी वाचा