Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ जून जानेवारी २०२४: आर्थिक लाभ होणार; एखादी आनंददायी बातमी समजेल!

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2024-06-24 07:52:562024-06-24 07:57:57 | Updated: 2024-06-24 07:57:57

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष:  आज आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्दया संबंधी वरिष्ठांशी विचार - विनिमय होतील. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल... आणखी वाचा 

वृषभ:  व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्‍या बातम्या आपणाला भाव विवश बनवतील... आणखी वाचा 

मिथुन:  आज अनियंत्रित रागाला लगाम घालावा लागेल. बदनामी व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व कार्यालयातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंग येतील... आणखी वाचा 

कर्क:  आजचा दिवस सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौज - मजेची साधने, उत्तम दागीने व वाहन खरेदी होईल... आणखी वाचा 

सिंह:  आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील... आणखी वाचा 

कन्या:  आजचा दिवस चिंता व उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील... आणखी वाचा 

तूळ:  आज आपण खूप भावनाशील व्हाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या प्रकृतीची काळजी राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नाही... आणखी वाचा 

वृश्चिक:  आजचा दिवस कार्यात यश व आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण व प्रेमाचे संबंध राहतील... आणखी वाचा 

धनु:  आज द्विधा मनःस्थिती व घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्त्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही... आणखी वाचा 

मकर: आजच्या दिवसाची सुरवात मंगल वातावरणाने होईल. एखादा मांगलिक प्रसंग घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल... आणखी वाचा 

कुंभ:  आज शक्यतो आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. स्वकीयांशी मतभेद होतील... आणखी वाचा 

मीन:   आज आपणास सामाजिक कार्यात किंवा समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. मित्र - स्नेह्यांशी सुसंवाद साधल्याने मनाला आनंद होईल. सुंदर स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत ठरवाल. एखादी आनंददायी बातमी समजेल... आणखी वाचा 

टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App