मेष: आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजनांपासून दूर राहावे लागेल. अन्यथा आळस व दुःखात वाढ होईल. हातातील कार्ये सहजपणे पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. व्यावसायिक कामानिमित्त प्रवास करावा लागेल. इतरांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. आणखी वाचा
वृषभ: आज सावध राहावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. काही ना काही कारणाने काळजी वाटेल. उक्ती आणि कृती ह्यात संतुलन ठेवावे लागेल. व्यवसायात अडचणी उद्भवतील. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांची नाराजगी ओढवून घ्यावी लागेल. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आणखी वाचा
मिथुन: आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. या आनंदात मित्र व संबंधितांना सहभागी करून घ्याल. दुपारनंतर मात्र मनात चिंता निर्माण होतील. हळवेपणाचे प्रमाण वाढेल. संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
कर्क: आज व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. बौद्धिक चर्चेत तार्किक विचारांचा वापर करायला आजचा दिवस अनुकूल आहे. सामाजिक सन्मान होईल. भागीदारांकडून लाभ होतील. आणखी वाचा
सिंह: रागावर नियंत्रण ठेवा. दुपारनंतर घरात आनंद- उत्साहाचे वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता व उत्साह जाणवेल. व्यवसायात लाभ संभवतो. सहकारी अपेक्षित सहकार्य करतील व त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. आणखी वाचा
कन्या: आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी व चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर मानहानी संभवते. धनहानी संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. कार्य साफल्य न झाल्याने निराश व्हाल. संतती विषयक चिंता सतावेल. आणखी वाचा
तूळ: आजचा दिवस नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान- सन्मान मिळतील. दुपारनंतर मात्र मन उदास होईल. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण क्लेशकारक राहील. स्थावर संपत्ती विषयक कागदपत्रांबद्दल सावध राहावे लागेल. आणखी वाचा
वृश्चिक: नियोजित काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील. दुपारनंतर भावंडांसह आनंदात वेळ घालवाल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. प्रवास घडतील. गूढ विषयांचे आकर्षण होईल. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साहित व ताजेतवाने राहाल. प्रत्येक काम उत्साहाने कराल. प्रवास संभवतो. दुपारनंतर मात्र द्विधा मनःस्थिती होईल. घरात व कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. वायफळ खर्च होतील. आणखी वाचा
मकर: आज कोणाला जामीन राहू नये, अन्यथा अडचणीत सापडाल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. बोलण्या वागण्यात संयमित राहावे लागेल. वाहन जपून चालवावे लागेल. दुपारनंतर मन प्रसन्न होईल. घरातील वातावरण चांगले राहील. हातून परोपकार किंवा एखादे सत्कार्य घडेल. आणखी वाचा
कुंभ: आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. नवीन परिचय होतील. परंतु दुपारनंतर प्रकृती बिघडेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. पैसा जास्त खर्च होईल. कामांत सावध राहावे लागेल. स्वभाव चिडचिडा होईल. आणखी वाचा
मीन: आज द्विधा मनःस्थितीमुळे आपले विचार ठाम राहू शकणार नाहीत. नोकरीत वरिष्ठांकडून लाभ होतील. पदोन्नती संभवते. व्यापार विषयक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. कुटुंबात सुख समाधान नांदेल. वडीलधार्यांकडून लाभ होतील. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक पातळीवर लाभ संभवतात. मित्रांसह सहलीस जाण्याचे आयोजन करू शकाल. आणखी वाचा