मेष: आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आपण एखाद्या काल्पनिक विश्वात रमून जाल. कलावंतांना आपली कला प्रदर्शित करण्याची संधी लाभेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. दैनंदिन कार्यात काही अडचणी निर्माण होतील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. परिश्रमाचे अपेक्षित यश मिळू शकणार नाही. आणखी वाचा
वृषभ: आज आपणास वाणी व वर्तन ह्यावर संयम ठेवावा लागेल. जमीन किंवा संपत्तीच्या दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सही करताना काळजी घ्यावी लागेल. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. मनात सुंदर कल्पना येतील. आणखी वाचा
मिथुन: आज सकाळी कार्यात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. ह्या सर्वांमुळे सकाळी आपण आनंदात असाल. नशिबाची साथ लाभेल. दुपार नंतर मात्र परिस्थितीत बदल होईल. कौटुंबिक मतभेद संभवतात. मनात नकारात्मक विचार येतील. आणखी वाचा
कर्क: आज द्विधा मनःस्थितीमुळे आपणास दीर्घकालीन योजनेचे आयोजन करताना अडचणी येतील. कुटुंबियांशी वाद होतील. दुपारनंतर मात्र परिस्थितीत अनुकूल बदल होईल. शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. भावंडांकडून काही लाभ प्राप्ती होईल. भावनिक नाते दृढ होईल. मनास शांतता लाभेल. आणखी वाचा
सिंह: आज आपल्या दृढ आत्मविश्वासाने प्रत्येक कामात आपण यशस्वी होऊ शकाल. मात्र, आपणास मन शांत ठेवावे लागेल. सरकारी कामातून फायदा होईल. कुटुंबियांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. खर्चात मात्र वाढ होईल. आणखी वाचा
कन्या: आज भावनेच्या भरात आपल्या हातून एखादी मोठी चुक घडू शकेल. वाद होतील. दुपारनंतर मात्र आत्मविश्वास वाढेल. सामाजिक मान - प्रतिष्ठेत वाढ होईल. रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
तूळ: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. त्यांच्याकडून एखादा फायदा संभवतो. व्यापारात लाभ होईल. कुटुंबियांशी सौहार्दाचे संबंध राहतील. दुपारनंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्य नाजूक होईल. वाद होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. एखादा आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. आणखी वाचा
वृश्चिक: दृढ मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर आज आपली सर्व कामे आपण सहजपणे पूर्ण करू शकाल. नोकरी - व्यवसायात आपल्या बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. नोकरीत आपल्या कामगिरीवर वरिष्ठ खुश होतील व त्यामुळे आपल्या पदोन्नतीची शक्यता वाढेल. वडिलधाऱ्यांशी आपले संबंध सौहार्दाचे होतील. तसेच त्यांच्याकडून एखादा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांकडून सुद्धा फायदा होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपण सकाळी एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. एखादे नुकसान होण्याच्या शक्यतेमुळे आपणास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. आपली कामे सहजपणे होतील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. आणखी वाचा
मकर: आज सकाळी प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मनात नकारात्मक विचार थैमान घालतील. अचानकपणे खर्चात वाढ होईल. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. एखादा प्रवास संभवतो. मनःशांती लाभेल. रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
कुंभ: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. लहानसहान गोष्टींवरून वैवाहिक जीवनात वाद होतील. हे वाद विकोपास जाऊ शकतात. सांसारिक प्रश्नांविषयी आपण उदासीन व्हाल. एखादी मानहानी संभवते. आपण नवीन कामाची सुरवात करू शकाल. स्फूर्ती व प्रसन्नतेचा अभाव जाणवेल. आणखी वाचा
मीन: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मन चिंतीत होईल. कार्यात अडचणी येऊन ती पूर्ण होण्यास विलंब होईल. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभणार नाही. वैवाहिक जीवनात कटकटी निर्माण होतील. सांसारिक जीवनाचा कंटाळा येईल. व्यापारात भागीदारांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा