मेष: आज ''कमी वेळात अधिक लाभ'' अशा एखाद्या योजनेत आपली फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या प्रकरणात अडकू नका. आज कोणाला जामीन राहू नका. आज मनाची एकाग्रता कमी राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक देवाण - घेवाणीत लक्ष द्यावे लागेल. एखादी दुर्घटना संभवते. आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस व्यावहारिक कार्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिने शुभ फलदायी आहे. मित्र व वडीलधार्यांचा सहवास लाभेल. नवे मित्र होतील व ती मैत्री दीर्घकाल टिकून राहील. संततीच्या प्रगतीमुळे मनाला आनंद मिळेल. प्रवास संभवतात. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आप्तांवर खर्च होईल. त्यांच्याशी मतभेद सुद्धा होतील. आणखी वाचा
मिथुन: आजचा दिवस पूर्णतः अनुकूल व लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन झाल्याने आपला प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल व जुनी येणी वसूल होतील. वडील व वयस्कर यांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. दुपार नंतर मित्रांकडून लाभ होईल. एखाद्या सामाजिक कार्यास हजेरी लावाल. आणखी वाचा
कर्क: आज वरिष्ठांशी वाद होण्याच्या शक्यतेमुळे उक्ती व कृती संयमित ठेवावी लागेल. शारीरिक अस्वास्थ्य व मानसिक चिंता राहील. व्यापारात विघ्ने येतील. दुपार नंतर मात्र व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आणखी वाचा
सिंह: आज वाद होण्याची शक्यता असल्याने संताप व वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कृत्य घडण्याची शक्यता आहे. मानसिक व्यग्रता राहील. कुटुंबियांशी भांडणे होतील. आणखी वाचा
कन्या: आज आपणास आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. सामाजिक मान - सन्मान होतील. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. करमणुकीमुळे दिवस आनंदात जाईल. व्यापारी येणी वसूल होतील. आणखी वाचा
तूळ: आजचा दिवस आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. कोणतेही कार्य खंबीर मनाने व आत्मविश्वासाने पूर्ण कराल. मन शांत ठेवा. घरातील वातावरण आनंददायी व शांत राहील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. कलावंतांना आजचा दिवस शुभ आहे. कार्यनैपुण्य आणि कलेची जाण प्रदर्शीत करण्याची संधी मिळेल. आणखी वाचा
वृश्चिक: आजचा दिवस साहित्यिकांना अनुकूल आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. शेअर्स, लॉटरी यात लाभ होईल. खंबीर मन व आत्मविश्वास वाढेल. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आईच्या तब्बेतीत बिघाड व घरातील गढूळ वातावरण यामुळे आपल्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. आर्थीक नुकसान व मानहानी संभवते. आणखी वाचा
मकर: आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा आहे. जोडीदाराशी संबंधातील गोडवा टिकून राहील. मित्रांसह एखाद्या सहलीचे आयोजन कराल. भावंडे व नातलगांशी चांगले संबंध राहतील. मान सम्मान वाढेल. आणखी वाचा
कुंभ: आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच संतापावर व जिभेवर ताबा ठेवावा लागेल. त्यामुळे कोणाशी कटुता येणार नाही व मनातून नकारात्मक विचार दूर होतील. दुपार नंतर विचारात स्थैर्य येईल. आणखी वाचा
मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्याने आपण उत्साहित राहाल. नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांसह वेळ आनंदात घालवाल. आणखी वाचा