आजचे राशीभविष्य - ४ जून २०२४; भाग्योदयाचा योग; मिळेल आनंदवार्ता, भरभराट होईल

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2024-06-04 08:02:562024-06-04 08:07:54 | Updated: 2024-06-04 08:07:54

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष

 

आज आपले प्रत्येक काम उत्साह व आवेश यांनी पूर्णतः भरलेले असल्याचा अनुभव आपणास येईल. शरीर व मन स्फूर्ती आणी टवटवीतपणाने भरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील... आणखी वाचा

वृषभ

आज क्रोध व निराशेची भावना मनात पसरेल. प्रकृती साथ देणार नाही. घर - परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल... आणखी वाचा

मिथुन

आज कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहील. नोकरी - व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील. उच्च पदाधिकारी आपल्या कामाची प्रशंसा करतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. स्त्री स्नेह्यांकडून विशेष लाभ होतील... आणखी वाचा

कर्क

आज नोकरीत वरिष्ठांच्या प्रोत्साहनाने आपला उत्साह द्विगुणित होईल. पगारवाढ किंवा पदोन्नती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. आई तसेच इतर कुटुंबीय /यांच्याशी सौहार्दाचे संबंध राहतील... आणखी वाचा

सिंह

आज आळस, थकवा व ऊबग आपल्या कामाचा वेग कमी करतील. पोटाच्या तक्रारी मुळे अस्वस्थता अनुभवाल. नोकरी - व्यवसायात विघ्न संतोषी लोकांमुळे प्रगतीत अडथळा येईल... आणखी वाचा

कन्या

आज 'मनावर संयम ठेवावा लागेल. स्वभावांतील उग्रतेमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. हितशत्रू विघ्न उपस्थित करतील. नवीन कार्यारंभ लांबणीवर टाका. जलाशया पासून दूर राहा... आणखी वाचा

तूळ

आज दैनंदिन कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून आपण मेजवानी, सिनेमा किंवा पर्यटन ह्यांची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. भिन्नालिंगी किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आपणास खूप आनंद होईल... आणखी वाचा

वृश्चिक​​​​​​​

कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासाने पूर्णपणे भरलेले असेल. शरीरात चैतन्य व उत्साह संचारेल. प्रतिस्पर्धी तसेच गुप्त शत्रू ह्यांच्यावर आपण मात करू शकाल. कामात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल... आणखी वाचा

धनु

आज शक्यतो प्रवासाचा बेत स्थगित ठेवावा. कार्यातील अपयश मनात नैराश्य निर्माण करील व त्यामुळे संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्यास गोष्टी जास्त चिघळणार नाहीत. पोटाच्या तक्रारीने हैराण व्हाल... आणखी वाचा

मकर

आज उत्साह व स्फूर्ती ह्यांचा अभाव असल्याने अस्वस्थता वाटेल. मनाला चिंता लागून राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन खिन्न होईल. वेळेवर भोजन व शांत झोप मिळणार नाही... आणखी वाचा

कुंभ

आज आपणास चिंतामुक्त झाल्याने जरा हायसे वाटेल. उत्साह वाढेल. वाडवडील व मित्र यांच्याकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता. स्नेहसंमेलन किंवा प्रवासाच्या माध्यमातून कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल... आणखी वाचा

मीन

आज आपणास बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. रागामुळे एखाद्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील. विशेषतः डोळ्यांकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीय व प्रियजन ह्यांच्याशी मतभेद संभवतात... आणखी वाचा

 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App