Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - 25 ऑगस्ट 2022 : कर्कसाठी चिंतेचा अन् मेषसाठी लाभाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2022-08-25 07:26:462022-08-25 07:27:30 | Updated: 2022-08-25 07:27:30

Today Daily Horoscope 25 August 2022 : कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य...

Open in app

मेष: आजची सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. व्यापार - व्यवसायात लाभ होतील. नोकरीत वरिष्ठ खुश होतील.  आणखी वाचा...

वृषभ: आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी आहे. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. आज दिवसाचा बहुतांश वेळ आपण आर्थिक नियोजन करण्यासाठी द्याल. आणखी वाचा...

मिथुन: आज आप्तेष्टांचा सहवास आनंददायी ठरेल. सुंदर वस्त्रे आणि उत्तम भोजनाचा लाभ होईल. मनात विविध प्रकारचे नकारात्मक विचार येतील, ते दूर सारणे हितावह राहील.  आणखी वाचा...

कर्क: आज प्राप्तीपेक्षा खर्चात वाढ होत असल्याचे जाणवेल. नेत्र विकार संभवतात. मानसिक चिंता वाढतील. आपल्या एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल. दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील. आणखी वाचा...

सिंह: आज आपल्या लाभात स्थानी असेल. आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आजचा दिवस आरोग्यास चांगला नाही. काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. कुटुंबियांशी कटुता निर्माण होईल. आणखी वाचा...

कन्या: आज सकाळची वेळ आपणास आनंददायी व लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. थकबाकी मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा...

तूळ: आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. नोकरी - व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल. नोकरीत पदोन्नती संभवते. शासकीय कामे सहजपणे होऊ शकतील. आणखी वाचा...

वृश्चिक: आज विरोधक व प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल राहील. संततीशी मतभेद संभवतात. दुपार नंतर सर्वांचा कल आपल्या विरुद्ध होईल. आणखी वाचा...

धनु: आज आपल्या संतापामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैनी वाढेल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभू शकणार नाही. संततीच्या समस्येमुळे आपण चिंतीत व्हाल. आणखी वाचा...

मकर: आज प्रिय व्यक्तीच्या सहवासात बाहेर फिरावयास व मेजवानीस जाऊन आपण आनंदित व्हाल. वाहनसौख्य व मान - सन्मान संभवतात. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्याच्या तक्रारी उदभवण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होईल. आणखी वाचा...

कुंभ: आजचा दिवस कार्य सफलतेचा असून आपल्या कीर्तीत भर पडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. सामाजिक मान - सन्मानात वाढ होईल. आणखी वाचा...

मीन: आजचा दिवस आनंददायी आहे. मित्रांच्या व प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. दुपार नंतर एखादा आर्थिक लाभ संभवतो. आणखी वाचा...

टॅग्स :फलज्योतिष
Open in App